महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 17, 2021, 4:02 PM IST

Updated : Aug 17, 2021, 7:54 PM IST

ETV Bharat / bharat

तालिबानचे महिलांना सरकारमध्ये सामील होण्याचे आवाहन

अफगाणिस्तानवर तालिबान या दहशतवादी संघटनेने पूर्ण नियंत्रण मिळवले आहे. या संघटनेच्या दहशतीमुळे नागरिक देश सोडण्याच्या तयारीत आहे. अशात आता तालिबान मीडिया टीमच्या सदस्याने महिलांना सरकारमध्ये सामील होण्याचे आवाहन केले आहे.

urges women to join government
तालिबान महिला आवाहन

काबुल -अफगाणिस्तानवर तालिबान या दहशतवादी संघटनेने पूर्ण नियंत्रण मिळवले आहे. या संघटनेच्या दहशतीमुळे नागरिक देश सोडण्याच्या तयारीत आहे. अशात आता तालिबान मीडिया टीमच्या सदस्याने महिलांना सरकारमध्ये सामील होण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा -अफगाणिस्तानातील परिस्थितीला स्थानिक नेतेच जबाबदार - अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडेन

ईनामुल्लाह समनगनी असे त्याचे नाव असून तो इस्लामी अमिरात संस्कृती आयुक्तचा सदस्य आहे. त्याने मंगळवारी अफगाणिस्तानच्या सरकारी टीव्ही चॅनलवर हे आवाहन केले. हे सरकारी चॅनेल आता तालिबानच्या ताब्यात आहे.

महिलांना त्रास व्हावा, असे इस्लामी अमिरातला वाटत नाही, असे सांगत सरकारची रचना पूर्णपणे स्पष्ट नाही, मात्र आमच्या अनुभवाच्या आधारावर त्यात पूर्ण इस्लामी नेतृत्व असावे आणि सर्व पक्षांना यात सामील केले पाहिजे, असे मत समनगनीने व्यक्त केले.

तालिबानने काही दिवसांतच प्रमुख शहरांवर मिळवले नियंत्रण

दोन दशकांपर्यंत चाललेल्या युद्धानंतर अमेरिकेने आपले पूर्ण सैन्य अफगाणिस्तानातून माघारी बोलावले. यानंतर तालिबानने या देशावर आपला ताबा मिळवला. बंडखोरांनी पूर्ण देशात परिस्थिती बिघडवून टाकली. येथील स्थानिक सुरक्षादलांनी शरणागती पत्करली. यामुळे काही दिवसांतच तालिबानने देशातील सर्व प्रमुख शहरांवर आपले नियंत्रण मिळवले.

तालिबानला धडा शिकवण्यासाठी बंडखोरांना सत्तेतून बाहेर ढकलले

अमेरिकेत 11 सप्टेंबर 2001 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर वाशिंग्टनने ओसामा बिन लादेन आणि त्याला शरण देणाऱ्या तालिबानला धडा शिकवण्यासाठी बंडखोरांना सत्तेतून बाहेर ढकलले. यानंतर, अमेरिकेने ऐबटाबादमध्ये ओसामा बिन लादेनचा खात्मा केला होता.

1990 च्या दशकाच्या शेवटपर्यंत तालिबानचे अफगाणिस्तानवर नियंत्रण होते. यानंतर पुन्हा एकदा त्यांनी या देशावर नियंत्रण मिळवले. तालिबानने अफगाणिस्तानात नियंत्रण मिळवल्याने येथील नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे. काबूल विमानतळावर देश सोडण्यासाठी नागरिकांची जमलेली गर्दी पाहून हे स्पष्ट होते की, नागरिकांमध्ये किती भीती निर्माण झाली आहे.

लष्कराला बोलवण्याचा निर्णय योग्य

अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अफगाणिस्तानमधून अमेरिकन लष्कराला परत बोलवण्याचा निर्णय योग्य असल्याचे मत व्यक्त केले आहे. तसेच, अफगाणिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती आमच्या अपेक्षेपेक्षा फारच लवकर निर्माण झाली, अशी कबुलीही बायडेन यांनी दिली. व्हाइट हाऊसमधील इस्ट रूममधून बायडेन यांनी अफगाणिस्तानमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशाला संबोधित केले.

अफगाणिस्तानमध्ये अशरफ घनी यांचे सरकार पडून तालिबानच्या हातात संपूर्ण देश गेल्यानंतर बायडेन यांचे हे पहिले भाषण होते. बायडेन यांनी सध्याच्या अफगाणिस्तानमधील परिस्थितीसाठी अफगाणी नेत्यांना जबाबदार धरले आहे. अफगाणी नेत्यांनी संघर्ष न करता हार मानली आणि देश सोडून पळून गेल्याचे मत बायडेन यांनी व्यक्त केले.

हेही वाचा -गाड्या भरून पैसे घेऊन पळाले अशरफ गनी, रशियाचा खळबळजनक दावा

Last Updated : Aug 17, 2021, 7:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details