नवी दिल्ली -तालिबानने अफगाणिस्तावर ताबा मिळवला असून देशात अराजकता पसरली आहे. भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान आतापर्यंतच चांगले द्विपक्षीय संबंध होते. मात्र, आता तालिबानी हातात सत्ता गेल्यानंतर सुरक्षा आणि व्यापार याबाबतीत भारतासाठी अडचणीची परिस्थिती निर्माण झाली. तालिबानने भारतासोबत होत असलेली आयात-निर्यात बंद केली आहे. भारतीय निर्यात संघटना फेडरेशनचे डॉ. अजय सहाय यांनी ही माहिती दिली.
तालिबानने सर्व मालवाहतूक बंद केली आहे. पाकिस्तानमार्गे मालवाहतूक होत असत. तो आता बंद करण्यात आला आहे. आम्ही अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, जेणेकरून आम्ही पुरवठा पुन्हा सुरू करू शकू. सध्या तालिबान्यांनी आयात -निर्यात बंद केली आहे, असे अजय सहाय म्हणाले.
दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यवसाय -
डॉ.अजय सहाय यांच्या मते, भारत व्यापाराच्या दृष्टीने अफगाणिस्तानचा सर्वात मोठा मित्र आहे. 2021 मध्ये निर्यात 835 मिलियन डॉलर होती. तर 510 मिलियन डॉलरची आयात आहे. आयात आणि निर्यातीव्यतिरिक्त भारताने अफगाणिस्तानातही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. ज्यामध्ये सुमारे 400 योजनांमध्ये 3 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आहे.