काबुल/नवी दिल्ली -सत्तेत आलेल्या तालिबानी दहशतवाद्यांनी आपले रंग दाखविण्यास सुरुवात केली आहे. हेलमांड प्रांतामधील नागरिकांना दाढी करणे किंवा दाढीचा कट करण्यावर तालिबानींनी बंदी लागू केली आहे. तसे करणे हे इस्लामिक कायद्याचे उल्लंघन असल्याचे तालिबानींनी म्हटले आहे.
दाढी करण्याच्या नियमाचे उल्लंघन केल्यास शिक्षा दिली जाईल, असे तालिबानींच्या धार्मिक पोलिसांनी म्हटले आहे. काही सलून व्यावसायिकांनी तालिबानींकडून नोटीस आल्याचे म्हटले आहे. मागील वेळी सत्तेत असतानाचे कठोर नियमांचे पालन करावे, असे नोटीसमधून सूचित होत असल्याचे नाभिकांनी म्हटले आहे.
हेही वाचा-48 तासांच्या आत सैनिकांच्या मृत्यूचा अमेरिकेने घेतला बदला; उडवली ISIS-K ची ठिकाणं
तालिबानींनी हेलमांड प्रांतामधील सलूनवर नोटीस लावली आहे. दाढी करण्याबाबतच्या नियमांचे पालन करावे, असे तालिबानी अधिकाऱ्यांनी म्हटल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. कोणालाही तक्रार करण्याचा अधिकार नाही.
हेही वाचा-पंजशीरमध्ये तालिबानी घुसले? शोटुल जिल्हा ताब्यात घेतल्याचा दावा