नवी दिल्ली - अपघात झाल्यापासून एक तासाच्या आत रुग्णालयात पोहोचवणाऱ्या व्यक्तीला 5000 रुपयांचे बक्षिस देण्यात येणार असल्याची योजना ही रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सुरू केली आहे. रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. 'सुवर्ण तास योजना' ही 15 ऑक्टोबर 2021 पासून सुरू होणार आहे. याबाबतचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील परिवहन विभागांना योजनेच्या संबंधीत पत्र पाठवले आहे.
सुवर्ण तास म्हणजे काय?
"सुवर्ण तास" म्हणजे दुखापत झाल्यापासून पुढील एक तास होय. हा एक तास हा दुखापतग्रस्तासाठी अत्यंत महत्वाचा असा असतो. दुखापतीनंतर एक तासाचा आत त्वरित त्याला वैद्यकीय सेवा मिळाली तर त्याचा मृत्यू टाळण्याची सर्वाधिक शक्यता असते. त्यामुळे या कालावधीला सुवर्ण काळ म्हटल्या जाते.
मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे उद्देशाने ही योजना -