महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Rahul Gandhi Flying Kiss : 'फ्लाइंग किस'चे सीसीटीव्ही फुटेज पाहून राहुल गांधींवर कारवाई करा, भाजपा खासदारांनी मागणी - स्मृती इराणी

राहुल गांधींनी लोकसभेत केलेल्या तथाकथीत 'फ्लाइंग किस' वरून राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपा खासदारांनी आता या प्रकरणी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली. 'फ्लाइंग किस'चे सीसीटीव्ही फुटेज पाहून राहुल गांधींवर कारवाई करा, अशी मागणी भाजपाने केली आहे.

Rahul Gandhi
राहुल गांधी

By

Published : Aug 9, 2023, 5:36 PM IST

नवी दिल्ली :लोकसभेत राहुल गांधींनी केलेल्या 'फ्लाइंग किस'चे सीसीटीव्ही फुटेज पाहून त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे करण्यात आली आहे. राहुल गांधी यांनी स्मृती इराणी आणि इतर महिला खासदारांना सभागृहात 'फ्लाइंग किस' दिल्याचा आरोप केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनी केला आहे. तसेच हे वर्तन पूर्णपणे चुकीचे असल्याचे त्या म्हणाल्या.

भारताच्या संसदीय इतिहासात असे कधीही घडले नाही : 'राहुल गांधी यांची वागणूक अयोग्य आणि अतिशय असभ्य आहे. भारताच्या संसदीय इतिहासात असे कधीही घडले नाही', असे केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे म्हणाल्या. 'सभागृहात असे प्रथमच घडत आहे की एखादा सदस्य महिलेला 'फ्लाइंग किस' देत आहे. भाजपच्या महिला खासदारांनी या वागणुकीबाबत सभापतींकडे तक्रार केली आहे. आम्ही सभापतींकडे सीसीटीव्ही फुटेज पाहून कारवाई करण्याची मागणी केली आहे', असे शोभा करंदलाजे म्हणाल्या.

लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून कारवाईची मागणी : केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे आणि केंद्रीय मंत्री दर्शना जरदोश यांच्यासह भाजपच्या महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून राहुल गांधींवर कारवाईची मागणी केली आहे. खासदार स्मृती इराणी यांच्या भाषणादरम्यान राहुल गांधी यांनी त्यांच्याशी असभ्य वर्तन आणि अयोग्य हावभाव केल्याचा आरोप आहे. हा महिला खासदार आणि लोकसभेचा अपमान असल्याचे सांगत भाजपच्या महिला खासदारांनी त्यांच्या तक्रार पत्रात राहुल गांधींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

स्मृती इराणींनी केले होते आरोप : तत्पूर्वी, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी लोकसभेत बोलताना राहुल गांधींवर नाव न घेता गंभीर आरोप केले. 'विरोधी पक्षाच्या एका खासदाराने भाषण केल्यानंतर महिला खासदाराकडे 'फ्लाइंग किस'चा इशारा केला', असे स्मृती इराणी म्हणाल्या. असे बोलताना त्यांनी राहुल गांधींकडे बोट दाखवले. त्यांच्या या आरोपानंतर सभागृहाचे वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने या प्रकरणावरून विरोधकांवर टीकेची झोड उठवली आहे.

हेही वाचा :

  1. Rahul Gandhi Flying Kiss : राहुल गांधींचा लोकसभेत फ्लाइंग किस? स्मृती इराणी बरसल्या...
  2. Rahul Gandhi in Parliament Updates :आम्ही शौचालयावर बोलतो, तेव्हा काँग्रेसचे खासदार हसतात- स्मृती इराणी
  3. Narendra Modi Targets Opposition : पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्लाबोल; भारत छोडो चळवळीतील स्वातंत्र्यवीरांना आदरांजली

ABOUT THE AUTHOR

...view details