हैदराबाद - काश्मीरमधील फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांचे बुधवारी रात्री 10.35 च्या दरम्यान श्रीनगरच्या हैदरपोरा येथील निवासस्थानी निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती.
कोण आहेत सय्यद अली शाह गिलानी?
सय्यद अली शाह गिलानी यांचा जन्म 29 सप्टेंबर 1929 रोजी जम्मू-काश्मीरमध्ये झाला होता. सुरूवातील ते जमात-ए-इस्लामी या संघटनेचे सदस्य होते. नंतर त्यांनी तेहरिक-ए-हुर्रियतची स्थापना केली. तसेच त्यांनी ऑल पार्टीज हुरियत कॉन्फरन्सचे अध्यक्ष म्हणून काम केले. ते 1972, 1977 आणि 1987 मध्ये जम्मू -काश्मीरच्या सोपोर मतदारसंघातून आमदार निवडून आले होते. तर जून 2020मध्ये त्यांनी हुरियतशी संबंध तोडले.
मेहबूबा मुफ्ती यांनी केले ट्वीट -
दरम्यान, जम्मू -काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी ट्विटरवर सय्यद अली शाह गिलानी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.