महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 24, 2022, 2:13 PM IST

ETV Bharat / bharat

Swiss Open Badminton: सिंधू, श्रीकांत आणि सायना स्विस ओपनच्या दुसऱ्या फेरीत दाखल

स्विस ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या ( Swiss Open badminton tournament ) दुसऱ्या दिवशी भारताच्या आघाडीच्या खेळाडूंनी आपले एकेरी सामने जिंकले. पीव्ही सिंधू, किदाम्बी श्रीकांत आणि सायना नेहवाल यांनी पुढील फेरीत प्रवेश ( Saina Nehwal next round ) केला. त्याचवेळी पारुपल्ली कश्यप आणि एचएस प्रणॉय यांनीही विजयाची नोंद करण्यात यश मिळवले. पुरुष दुहेरीत स्वस्तिक-चिराग आणि इशान-साई प्रतीक या जोडीनेही पुढची फेरी गाठली.

Saina Nehwal
Saina Nehwal

बासेल (स्वित्झर्लंड): किदाम्बी श्रीकांतने डेन्मार्कच्या मॅड्स क्रिस्टोफरसनचा 21-16, 21-17 असा ( Kidambi Srikanth defeated Mads Christopherson ) पराभव करून स्विस ओपन स्पर्धेच्या पुढील फेरीत प्रवेश केला. श्रीकांतने 32 मिनिटांत सामना जिंकला. दुसऱ्या फेरीत श्रीकांतची लढत फ्रान्सच्या क्रिस्टो पोपोव्हशी होणार आहे.

श्रीकांतशिवाय भारताच्या पारुपल्ली कश्यपनेही पहिली फेरी जिंकली ( Parupalli Kashyap won the first round ). कश्यपने फ्रान्सच्या अनुगत रॉयचा 21-17, 21-9 असा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला. दोन सत्रांनंतर कश्यपचा हा पहिलाच विजय आहे. 2020 मध्ये झालेल्या चार आणि 2021 मध्ये झालेल्या नऊ स्पर्धांमध्ये कश्यपला एकही विजय मिळवता आला नाही. आता पुढच्या फेरीत कश्यपचा सामना डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सेलसेनशी होईल, ज्याने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आणि नुकतेच ऑल इंग्लंड बॅडमिंटनचे विजेतेपद पटकावले आहे. एसएस प्रणॉयने पहिल्या फेरीत भारताच्याच बीएस प्रणीतचा 25-23, 21-16 असा पराभव करून पुढील फेरीत प्रवेश केला. त्याचबरोबर समीर वर्मा ही दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवण्यात यशस्वी ठरला आहे.

द्वितीय मानांकित पीव्ही सिंधूने ( Second ranked PV Sindhu ) डेन्मार्कच्या लिन जेर्सफेल्डचा 21-8, 21-13 असा पराभव करून पुढील फेरीत प्रवेश मिळवला. पुढील फेरीत सिंधूची लढत तुर्कीच्या नेस्लिहान यिगितशी होईल. दुसरीकडे, सायनाने पहिल्या फेरीत तिची प्रतिस्पर्धी फ्रान्सच्या याएला हाऊ हिचा 21-8, 21-13 असा सहज पराभव केला. सायनाने 2011 आणि 2012 मध्ये स्विस ओपनचे एकेरीचे विजेतेपद पटकावले होते. तसेच ती विजेतेपद जिंकणारी एकमेव भारतीय महिला खेळाडू आहे. सायनाची पुढील फेरीत मलेशियाच्या किसोना सेल्वादुरेशी लढत होईल. भारताच्या अश्मिता चालिहा हिनेही पुढील फेरीत स्थान निश्चित केले आहे. अश्मिताने फ्रान्सच्या लिओनिस ह्युएटचा तीन सेटपर्यंत चालल्या सामन्यात 19-21, 21-10, 21-11 असा पराभव केला. परंतु, आकर्षी कश्यप आणि मालविका बनसोड या दोघीही महिला एकेरीत आपापले सामने गमावून स्पर्धेतून बाहेर पडल्या आहेत.

पुरुष दुहेरीच्या पहिल्या फेरीच्या सामन्यात स्वस्तिकराज रणकिरेड्डी आणि चिराग शेट्टी, या तिसऱ्या मानांकित भारतीय जोडीने अलीकडेच ऑल इंग्लंड विजेतेपद ( All England Championship ) पटकावणाऱ्या इंडोनेशियन जोडीचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. स्वस्तिक-चिराग जोडीने पहिला सेट गमावल्यानंतर फिकरी-मौलाना जोडीचा 17-21, 21-11, 21-18 असा पराभव केला. याशिवाय ईशान भटनागर-साई प्रतीकनेही आपला सामना जिंकला. एमआर अर्जुन आणि ध्रुव कपिला या जोडीला पराभवाचा सामना करावा लागला, तर पुरुष दुहेरीत वसंत रंगनाथ-असित सूर्या ही जोडीही पहिल्या फेरीत पराभूत होऊन बाहेर पडली.

महिला दुहेरीत ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीतील ट्रीसा-जॉली आणि गायत्री गोपीचंद जोडीला थायलंडच्या द्वितीय मानांकित किथितारकुल-प्रजोंगझाईने 21-10, 21-17 असे पराभूत केले. पण अश्विनी पोनप्पा-एन सिक्की रेड्डी यांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवण्यात यशस्वी झाले. मिश्र दुहेरीत उरलेली एकमेव भारतीय जोडी, सुमित रेड्डी-अश्विनी पोनप्पा ( Sumit Reddy-Ashwini Ponnappa out ), फ्रेंच जोडीकडून पराभूत होऊन बाहेर पडली.

ABOUT THE AUTHOR

...view details