त्रिपुरा (अगरतला) - त्रिपुराच्या सेपाहिजाला जिल्ह्यातील देवीपूर येथील पशु संसाधन विकास विभागाच्या (ARDD) प्रजनन फार्ममध्ये डुकरांना स्वाइन फ्लूची लागन झाल्याचे समोर आले आहे. हा आफ्रिकन स्वाइन फ्लू असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आता त्रिपुरा सरकार सतर्क झाले आहे. (दि. 7 एप्रिल) रोजी तीन नमुने प्रादेशिक रोग निदान प्रयोगशाळेत पाठवले होते. त्यांचा रिपोर्ट (दि.13 एप्रिल)रोजी पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, येथील शेतात असलेल्या डुकरांमध्येही हा रोग आधीच शेतात शिरला आहे. दरम्यान, आम्ही भोपाळच्या राष्ट्रीय रोग निदान संस्थेकडून येणार्या दुसर्या अहवालाची वाट पाहत आहोत अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
नोडल अधिकाऱ्यांच्या पॅनेलला अहवाल - या घटनेनंतर आरोग्य विभागासह इतर संबंधीत विभागही चांगलेच सतर्क झाले आहेत. आता आरोग्य विभागाने प्रत्येक गटात दहा लोकांचा समावेश करून दोन तात्काळ प्रतिसाद पथक तयार केले आहेत. या सर्व टीमचे नेतृत्व पशुवैद्यकीय अधिकारी करणार आहेत. तसेच, नोडल अधिकाऱ्यांच्या पॅनेलला थेट अहवाल देणार आहेत.