लखीमपूर खीरी - उत्तरप्रदेश भाजप प्रदेश अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री आदित्यनाथ योगींचे तोंडभरून कौतुक केले. त्यांनी म्हटले की अयोध्येत भव्य राम मंदिराचे निर्माण करून मोदींनी इतिहास रचला. जर पंतप्रधानांची इच्छा असेल तर ते दुबई व लंडनमध्येही भव्य मंदिरांचे निर्माण करतील.
2022 पर्यंत सर्वांनी पक्की घरे देण्याचे लक्ष्य -
स्वतंत्र देव सिंह यांनी सांगितले, की मोदी सरकारवर अजूनपर्यंत भ्रष्टाचाराचा एकही आरोप लागलेला नाही. पंतप्रधानांचे स्वत:साठी पक्के घर नाही मात्र २०२२ पर्यंत सर्व देशवासीयांना पक्के घर देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. भाजप सरकारने कोणताही धर्म व जात न पाहता ४० लाख घरे वितरीत केली आहेत. एक कोटी 38 लाख लोकांनी मोफत वीज कनेक्शन दिले आहे. कोरोना काळात प्रवासी मजुरांना मोफत राशन कार्ड दिले.