इंदूर - मध्य प्रदेशातल्या इंदूर (cleanest city indore) या शहराने सलग पाचव्या वर्षी देशातले सर्वांत स्वच्छ शहर (Cleanest City in India) बनण्याचा मान मिळवला आहे. आज (20 नोव्हेंबर) नवी दिल्लीत झालेल्या सोहळ्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते स्वच्छ सर्वेक्षण 2021मधल्या विजेत्या शहरांचा गौरव करण्यात आला. गुजरातमधले सुरत (Surat) शहर दुसरे, तर आंध्र प्रदेशातले विजयवाडा (Vijayawada) शहर देशातले तिसऱ्या क्रमांकाचे सर्वांत स्वच्छ शहर ठरले आहे. तर चौथ्या क्रमांकावर नवी मुंबई असून पाचव्या क्रमांकावर पुण्याने झेप घेतली आहे.
गेल्या वर्षी नवी मुंबई हे देशातले तिसरे सर्वांत स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आले होते. तसेच, गेली सलग पाच वर्षं नवी मुंबईने (Navi Mumbai) महाराष्ट्रातले सर्वांत स्वच्छ शहर हा आपला किताब कायम राखला आहे; मात्र यंदा देशपातळीवरच्या स्वच्छ शहरांच्या पहिल्या तीन क्रमांकांमध्ये नवी मुंबईला स्थान मिळालेले नाही.
या अश्या बद्दल मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. इंदूर शहराला मागील चार वेळा हा बहुमान मिळाला आहे.
इंदूरला पाचव्यांदा मिळाला बहुमान -