नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे भ्रष्टाचाराची तक्रार करणाऱ्या संतोष पाटील यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पाटील हे कंत्राटदारासह ते हिंदू युवा वाहिनीचे राष्ट्रीय सचिवही होते. तसेच, भाजपचे कार्यकर्तेही होते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूमुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे. काँग्रेसकडून हा मुद्दा उचलुन धरला जात असल्याने पाटील यांच्या मृत्यूनंतर ईश्वरप्पा यांच्या राजीनाम्याची मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे.
पंतप्रधान आणि मुख्यमंत्रीही सहआरोपी आहेत - ही घटना समोर आल्यानंतर राहुल गांधी यांनीही ट्विट करत पंतप्रधानांसह मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यावरही निशाणा साधला आहे. 'कर्नाटकातील भाजपच्या 40 टक्के कमिशन सरकारने त्यांच्याच कार्यकर्त्याचा बळी घेतला आहे. पंतप्रधानांकडे तक्रार करूनही काहीच उत्तर मिळाले नाही. पंतप्रधान आणि मुख्यमंत्रीही सहआरोपी आहेत, अशी टीका राहुल यांनी केली आहे. या घटनेवर थेट राहुल यांनीच लक्ष वेधल्याने पुढील काळात कर्नाटक काँग्रेसकडून या मुद्यावरून भाजपविरोधात जोरदार आंदोलन होण्याची शक्यता आहे.
ईश्वरप्पा हे आपल्या मृत्यूला कारणीभूत असतील - मंगळवारी (दि. 12 एप्रिल)रोजी सकाळी उडपी येथील एका हॉटेलमध्ये पाटीला यांचा मृतदेह आढळून आला आहे. ही आत्महत्या असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मागील काही दिवसांपासून ते बेपत्ता होते. बेळगावी पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात होता. दरम्यान, या काळात पाटील यांनी त्यांच्या मित्रांना मेसेज केला होता. ईश्वरप्पा हे आपल्या मृत्यूला कारणीभूत असतील, त्यांना शिक्षा झाली पाहिजे, अस आपल्या मेसेजमध्ये पाटील यांनी म्हटले होते.