नवी दिल्ली- दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने जामियानगरमधून अटक केलेला संशयित दहशतवादी ओसामाच्या घरातील सदस्यांची भूमिका देखील संशयास्पद आहे. पोलिसांच्या चौकशीत हे समोर आले आहे की, ओसामाला पाकिस्तानात जाऊन दहशती कारवायांचे प्रशिक्षण घेण्यासाठी त्याचे वडील आणि त्याच्या काकानेही मदत केली होती. यासाठी या दोघांनी ओसामाला जवळपास तीन लाख रुपये दिले होते. ओसामाच्या मोबाईलमधून शंकास्पद चॅटिंग पोलिसांच्या हाती लागले आहे. या सर्व शक्यता लक्षात घेतच पोलिसांनी ओसामाची चौकशी सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्पेशल सेलने मंगळवारी दिल्ली, राजस्थान आणि यूपीमधून सहा संशयित दहशतवाद्यांना अटक केली होती. यामध्ये दिल्लीच्या जामिया नगरचा रहिवासी ओसामाचा समावेश आहे. अटक केलेले ओसामा आणि जिशान हे 15 दिवसांसाठी पाकिस्तानात गेले होते, तिथे त्यांना दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यांना शस्त्रे वापरण्याचे तसेच स्फोट घडवून आण्यासाठी बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणानंतर दोघे एप्रिलमध्ये भारतात परतले होते.
ओसामाचे वडील दुबईत मदरसा चालवतात-
ओसामाचे वडील आणि काकांची भूमिकाही पोलिसांना संशयास्पद वाटली आहे. चौकशी दरम्यान, पोलिसांच्या टीमला माहिती मिळाली आहे, की ओसामाच्या पासपोर्टमध्ये ओमान जाण्यापर्यंतची कागदपत्रांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, पुढील कोणत्याही कागदपत्रांचा उल्लेख करण्यात आला नाही. ओसामाचे वडील दुबईत राहतात आणि या दहशतवादी प्रशिक्षणासाठी त्यांनी आपल्या मुलाचा संपूर्ण खर्च उचलला होता. त्यांच्या काकांनीही या कामात मदत केली. ओसामाचे वडील दुबईमध्ये मदरसा चालवतात. पोलीस आता त्याचे वडील आणि काकांच्या या प्रकरणातील भूमिकेचा तपास करत आहेत.
मूलचंद उर्फ लाला हा कुख्यात शूटर-