बँकाक - चीनने पुन्हा एकदा कुरापत समोर आली आहे. चीनचे समर्थन असलेल्या ग्रुपकडून भारतीय माध्यम, पोलीस विभाग आणि नागरिकांच्या ओळखपत्रांची माहिती असलेल्या आधार संस्थेच्या डाटाबेसवर हल्ला झाल्याचा दावा अमेरिकेच्या खासगी सायबर सुरक्षा कंपनीने केला आहे.
एमआयटीमधील इनसिक्ट ग्रुपकडून सायबर हल्ल्यांबाबत संशोधन केले जाते. या इनसिक्ट ग्रुपच्या माहितीनुसार टीएजी-28 असे तात्पुरते नाव असलेल्या हॅकिंग ग्रुपने विन्नती मालवेअर तयार केले. हे मालवेअर चीन सरकारचे समर्थन असलेल्या विविध अॅक्टिव्हिटी ग्रुपमध्ये शेअर करण्यात आले. याबाबतचे आरोप चीनच्या यंत्रणेने वारंवार फेटाळले आहेत. चीनच हे सायबर हल्लेखोरांचे मोठे लक्ष्य ठरल्याचा दावा चीनच्या सरकारी यंत्रणेने केला आहे.
हेही वाचा-VIDEO धक्कादायक! साडी घातल्याने दिल्लीतील रेस्टॉरंटने महिलेला नाकारला प्रवेश
हेही वाचा-भारताने गाठला मैलाचा दगड: देशातील 83 कोटींहून अधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण
या भारतीय संस्थांवर झाला सायबर हल्ला
- इनसिक्ट ग्रुपच्या माहितीनुसार देशातील एका आघाडीच्या माध्यमातील चार आयपी अॅड्रेस असलेल्या सिस्टिमवर सायबर हल्ले करण्यात आले. हे हल्ले फेब्रुवारी ते ऑगस्टदरम्यान विन्नती सर्व्हरवर करण्यात आले. त्यावेळी 500 मेगाबाईटचा डाटा हा मुंबईमधील माध्यम कंपनीमधून घेण्यात आल्याचे इनसिक्ट ग्रुपने म्हटले आहे.
- आधार संस्थेवरही हल्ला झाल्याचे संशोधक ग्रुपने म्हटले आहे. 10 मेगाबाईटचा डाटा आधारच्या नेटवर्कवरून डाऊनलोड झाला आहे. तर 30 मेगाबाईटचा डाटा अपलोड झाला आहे. नेटवर्कच्या पायाभूत सुविधांमध्ये मॅलिसियस टूल टाकण्यात आल्याचा संशयही या संशोधक ग्रुपने व्यक्त केला आहे.
- भारत-चीनमध्ये जून 2020 दरम्यान तणावाची स्थिती होती. त्यावेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी चीनच्या वस्तुंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी मध्य प्रदेश पोलिसांकडील 5 मेगाबाईटचा डाटा वळविण्यात आल्याचे इनसिक्ट ग्रुपने म्हटले आहे.