नवी दिल्ली : माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांच्या कन्या बन्सुरी स्वराज यांची दिल्ली भाजपच्या कायदेशीर विभागाच्या सहसंयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर वीरेंद्र सचदेवा यांनी ही पहिलीच नियुक्ती केली आहे. पक्षाला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, तुम्ही त्यांच्या अपेक्षा पूर्ण कराल आणि संघटना आणखी मजबूत कराल, असे पत्र त्यांनी स्वराज यांना दिले आहे. त्यामुळे बन्सुरी स्वराज यांनी राजकारणात प्रवेश केल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
सर्वोच्च न्यायालयात करतात वकिली:बन्सुरी या दिवंगत सुषमा स्वराज यांच्या एकुलत्या एक कन्या आहेत. त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आहे. इनर टेंपलमधून कायद्याची पदवी घेतल्यानंतर त्या वडिलांप्रमाणे दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात फौजदारी वकील आहेत.
भाजपने पदावर केली नियुक्ती ललित मोदीचा पासपोर्ट पुनर्संचयित करण्यात मदत केल्याचा आरोप: बन्सुरी याआधी आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांना त्यांचा पासपोर्ट पुनर्संचयित करण्यात मदत केल्याचा आरोप झाल्यानंतर चर्चेत आल्या होत्या. 27 ऑगस्ट 2014 रोजी उच्च न्यायालयाने माजी आयपीएल प्रमुख ललित मोदी यांचा पासपोर्ट पुनर्संचयित केला. पासपोर्ट प्रकरणात दिलासा मिळाल्यानंतर ललित मोदी यांनी त्यांच्या कायदेशीर टीमचे अभिनंदन केले. यानंतर, ललित मोदींनी आपल्या ट्विटमध्ये कायदेशीर टीमच्या सदस्यांची नावे सांगितली, त्यात बन्सुरी यांच्यासह इतर आठ वकिलांचा समावेश होता. जेव्हा गोंधळ वाढला तेव्हा भाजपने बन्सुरी यांचा बचाव केला आणि सांगितले की, सुषमा स्वराज यांच्या मुलीचा स्वतःचा व्यवसाय आहे आणि ती तिचे काम करण्यास मोकळी आहे.
2019 मध्ये सुषमा स्वराज यांचे निधन: माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांचे 2019 मध्ये वयाच्या 67 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तेव्हापासून त्यांची मुलगी बन्सुरी स्वराज तिच्या आईची पुण्यतिथी आणि वाढदिवस अगदी वेगळ्या पद्धतीने साजरी करत आहे. नुकतेच सुषमा स्वराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त बन्सुरी यांनी एक भावनिक पोस्ट लिहिली होती, ज्यामध्ये ती आजही माझी उर्जा म्हणून माझ्या नसांमध्ये वाहते, तुमचा विवेक माझ्या निर्णयात सामील आहे. आणि तुमचे आदर्श माझ्या जीवनाचा मार्ग उजळतात. त्यांनी भगवान श्रीकृष्णाला प्रार्थना केली होती की हे कृष्णा, तू माझी आई चोरली आहेस आणि आता तिला सुरक्षित ठेव.
हेही वाचा: माफिया अतिक अहमद घाबरला, म्हणाला माझी हत्या करण्याचा प्लॅन