नवी दिल्ली: ज्युनियर राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियन सागर धनखर यांच्या हत्येतील मुख्य आरोपी ऑलिम्पियन कुस्तीपटू सुशील कुमार याला त्याच्या वडिलांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी दिल्ली न्यायालयाने सोमवारी चार दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला. न्यायालयाने त्यांना मानवतेच्या आधारावर जामीन मंजूर केला आहे. सुशील कुमार 2 जून 2021 पासून तुरुंगात आहे. 4 मे 2021 रोजी दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये सोनीपत येथील रहिवासी असलेल्या कुस्तीपटू सागर धनखरला काही लोकांनी बेदम मारहाण केली होती.
सागर धनखर यांच्या हत्येचा आरोप : ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या सुशील कुमारवर यांच्यावर या खुनाचा आरोप आहे. त्याचा व्हिडिओ समोर आला असता दिल्ली पोलिसांनी कुस्तीपटू सुशील कुमारला त्याच्या साथीदारांसह पकडले. सुशील कुमारवर दिल्ली न्यायालयाने खून, खुनाचा प्रयत्न, दंगल, बेकायदेशीर कृत्ये आणि इतर गुन्हेगारी खटल्यांखाली खटला चालवला आहे. आरोप निश्चित केले आहेत. सुशील कुमारसह इतर १७ ज्युनियर कुस्तीपटूंचाही यामध्ये समावेश आहे. या सर्वांवर सागर धनखर यांच्या हत्येचा आरोप आहे.