हैदराबाद :आज तूळ संक्रांती, सूर्याच्या एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश होण्याला संक्रांती म्हणतात. वर्षभरात एकूण 12 संक्रांती येतात. आज सूर्य कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करत आहे. तुमच्या राशीनुसार काय आहेत सूर्य संक्रांतीतील उपाय घ्या जाणून.
मेष :आज सूर्य तूळेत प्रवेश करत आहे. या एका महिन्यात आपले मतभेद वाढू शकतात. वैवाहिक जोडीदाराशी संवाद साधताना शांत राहावे. आपली आर्थिक स्थिती सामान्य राहील. खर्च वाढतील. या दरम्यान आपण प्रवास सुद्धा करू शकता.
उपाय : कुंकू मिश्रित पाण्याने सूर्यास अर्घ्य द्यावा.
वृषभ : सूर्याचे हे राशी परिवर्तन आपल्यासाठी चांगले असेल. आपले विरोधक कमी होतील. परदेशाशीसंबंधित कामात आपला फायदा होईल. या दरम्यान एखाद्या जुनाट आजारातून सुद्धा आपली सुटका होऊ शकते.
उपाय : रोज गायत्री चालिसाचे पठन करावे.
मिथुन : सूर्याचे हे राशी परिवर्तन आपणास सामान्याहून चांगले फळ देणारे आहे. आपण एखाद्या उच्च शिक्षणात भरीव कामगिरी कराल. या दरम्यान घरासाठी एखादे वाहन किंवा अंतर्गत सजावटीसाठी सामानांची खरेदी करू शकता. आपल्या सन्मानात वाढ होईल.
उपाय : आदित्य हृदय स्तोत्राचे पठन करावे.
कर्क :सूर्याचे हे राशी परिवर्तन आपल्यासाठी काहीसे त्रासदायी होऊ शकते. नोकरीत आपली बदली संभवते. या दरम्यान आपणास आपल्या मातेच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आपले जीवन सामान्यच राहील.
उपाय : सूर्याष्टकाचे पठन करावे.
सिंह : आता सूर्य तूळेत प्रवेश करेल. ह्या दरम्यान आपणास नशिबाची साथ मिळेल. आपणास कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. आपल्याला प्रवासात काळजी घ्यावी लागेल. आपल्या पराक्रमात वाढ होईल.
उपाय:-गायत्री मंत्राचा एक माळ जप करावा.
कन्या : सूर्याचे तूळेतील भ्रमण आपल्यासाठी सामान्यच आहे. या दरम्यान कुटुंबियांसह एखाद्या ठिकाणी फिरावयास जाण्याचा कार्यक्रम ठरवू शकता. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली आपली कामे पूर्णत्वास जाऊ शकतात.
उपाय : सूर्यास रोज अर्घ्य द्यावा.