बारडोली, सूरत (गुजरात)- पलसाणा तालुक्यातील चलठण येथील राम कबीर सोसायटीत तीन दरोडेखोरांनी दरोडा टाकला. मात्र कुटुंबातील 20 वर्षीय मुलीने धाडस दाखवत शस्त्राचा धाक दाखवून दरोडेखोरांना घर सोडण्यास भाग पाडले. चोरट्यांशी सामना करताना हाताला दुखापत झाल्याने तिला 24 टाके पडले. तिने स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण घेतले होते. त्यामुळे तिचे हे प्रशिक्षण प्रत्यक्षात कामी आले. पोलिसांनी तपास सुरू केला असून शूर मुलीचे सर्वत्र कौतूक होत आहे.
रात्री उशिरा घरात शिरले चोर- पलसाणा तालुक्यातील चलठाण गावातील रेल्वे फाटक जवळील रामकबीर सोसायटी बाबुराम काशिनाथ स्वाईन व त्यांचे कुटुंबीय राहतात. ते जन्माने महाराष्ट्रीयन आहेत. बाबुराम यांना मंगळवारी मिलमध्ये रात्रीची ड्युटी होती. त्यामुळे घरी त्यांची दोन मुले, रिया आणि ऋचा तसेच त्यांची पत्नी भारतीबेन बाबुराम स्वेन होत्या. भारतीबेन आणि ऋचा यांनी कुटुंबासोबत होते. रिया स्वाईन ही मोठी मुलगी रात्री वाचन करत होती. दरम्यान, मध्यरात्र दीडच्या सुमारास घरातील लाईट गेली आणि तीन चोर आत शिरले.