सूरत :तरुणाईचा आवडता व्हॅलेंटाईन डे उद्या जगभरात साजरा करण्यात येत आहे. या दिवशी प्रेमीयुगुल एकमेकांना भेटवस्तू देतात. सूरतमधील तरुणीईमध्येही यावर्षी व्हॅलेन्टाईन डे निमित्त सळसळता उत्साह असल्याचे दिसून येत आहे. व्हॅलेन्टाईन डेला गुलाब देऊन आपल्या प्रेमाची कबुली दिली जाते. तसेच तरुणाई त्यांच्या प्रियकर आणि प्रेयसीला महागडे पुष्पगुच्छ देऊन आपले प्रेम व्यक्त करतात. मात्र यावर्षी सूरतमध्ये सोन्याचे गुलाब पुष्प देण्याचा ट्रेंड आला आहे. सूरतच्या एका तरुणीने आपल्या पतीला सोन्याचा मुलामा असलेले दिलचे व्हॅलेन्टाईन गिफ्ट बनवले आहे. परिधी असे त्या तरुमीचे नाव असून दीप असे तिच्या पतीचे नाव आहे.
तरुणीने नवऱ्यासाठी बनवले सोन्याचे दिल :लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला सूरतच्या परिधी या तरुणीने आपल्या पती दीपला खास गिफ्ट देण्याचे ठरवले होते. त्यामुळे तिने लग्नानंतरच्या पहिल्या व्हॅलेंटाईन डेला 108 सोन्याचा मुलामा असलेल्या गुलाबांचा खास हृदयाच्या आकाराचा पुष्पगुच्छ बनवला. हे पाहून तिचा पती दीपलाही खूप आनंद झाला. व्हॅलेन्टाईन डे ला नवरा किंवा प्रियकर भेटवस्तू देतात. मात्र परिधीने आपल्या पतीला खास सरप्राईज देण्याचा निर्णय घेतला आहे. परिधीने बनवलेल्या या खास सोन्याच्या गुलाबपुष्पावर आता अनेक तरुणाईच्या नजरा खिळल्या आहेत.
हिऱयाची अंगठी घेण्यासाठी गेल्यानंतर आवडला गुलाब :आपल्या पतीला खास गिफ्ट घेण्यासाठी गेलेल्या परिधी यांना हिऱ्याची अंगठी घ्यायची होती. मात्र त्यांनी यावेळी सोन्याच्या दुकानात सोनेरी गुलाब दिसला. त्यामुळे त्यांनी लग्नानंतरच्या पहिल्या व्हॅलेंटाईन डेला पतीला हा गोल्डन रोझ बुके गिफ्ट देण्याचे ठरवले. या गुच्छात 108 सोन्याचे प्लेटेड गुलाब आहेत. 108 ही संख्या पती पत्नीत एकता दर्शवत असल्याचे परिधीने यावेळी सांगितले. त्यामुले 108 या संख्येमुळे पती-पत्नीमध्ये प्रेम वाढून ते कायमचे एक होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे हे सरप्राईज देण्याचे ठरवल्याचे परिधीने यावेळी सांगितले.