सुरत Surat Crime : मध्य प्रदेशातील इंदौर जिल्ह्यातील दोन अल्पवयीन मुली सुरतला पळून गेल्या होत्या. कुटुंबीयांनी मुलींवर सोशल मीडियाचे निर्बंध लावल्यानंतर या दोन अल्पवयीन मुली घर सोडून सुरतला पळून गेल्या. पोलिसांना सुरत बस स्थानकात मुलगी आढळून आली. पोलिसांनी दोघींची चौकशी केली. तसंच महाराष्ट्रातून सुरतला आलेली आणखी एक अल्पवयीन मुलगी पोलिसांना सापडली आहे.
"सुरतमध्ये घरातून पळून गेलेल्या तीन किशोरवयीन मुली त्यांच्या कुटुंबीयांकडे सुखरूप परतल्या आहेत. मध्य प्रदेशातील दोन मुलींनी सांगितले की, कुटुंबानं त्यांच्यावर अनेक बंधनं लादली आहेत. कुटुंबानं विशेषतः सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घातली आहे. कुटुंबात कठोर निर्बंध घातले होते. त्यामुळेच ती घरातून पळून गेली. दरम्यान, महाराष्ट्रातील मुलीनं सांगितलं की, तिचे कुटुंबीय तिच्यावर प्रेमसंबंध असल्याचा संशय घेऊन तिला मारहाण करायचे." - जे. बी. चौधरी (पीआय, महिधरपुरा पोलीस स्टेशन)
- घरात न सांगता पळून गेल्या: मुलींनी पोलिसांना सांगितलं की, 23 ऑक्टोबर 2023 रोजी पालकांना न सांगता घरातून पैसे घेऊन बसनं सुरतला पोहोचलो. सुरत पोलिसांनी मुलींनी दिलेल्या पत्त्यावर तपास केला असता त्यांच्या कुटुंबीयांनी तेथील पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रारही दाखल केल्याचं समजलं.