नवी दिल्लीSupriya Sule slammed BJP - महाराष्ट्राच्या भाजप तत्कालीन प्रदेशाध्यक्षांनी ( चंद्रकांत पाटील) यांनी केलेल्या टीकेची खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप नेत्यांना संसदेत आठवण करून दिली. खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनी घरी जावून स्वयंपाक करा, देश आम्ही चालवू असे म्हटले होते. तुम्ही बोलले म्हणजे ठीक, आम्ही बोललो म्हणजे चूक, असं नसतं असा टोला खासदार सुळे यांनी भाजपा लगावला.
लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावरील चर्चेत भाग घेताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या महिला आरक्षण विधेयकाला ‘पोस्ट डेटेड चेक’ असे म्हटलं. सरकारनं आरक्षणाच्या अंमलबजावणीची तारीख आणि कालमर्यादा स्पष्ट करावी, अशी खासदार सुळे यांनी मागणी केली.
महिला आरक्षण आम्हाला कसं मिळणार आहे-'नारी शक्ती वंदन विधेयक हे जनगणना आणि लोकसभा मतदारसंघाची पुनर्चना केल्याशिवाय लागू होऊ शकत नाही. जनगणना आणि मतदारसंघाची पुनर्रचना अद्याप ठरलेली नसल्यानं हे विधेयक संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मांडता आलं असतं. संपूर्ण देशात दुष्काळ आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात दुष्काळावर चर्चा का होऊ शकत नाही? माझा सरकारला प्रश्न आहे की पुढील जनगणनेची तारीख आणि मतदारसंघाची पुनर्रचना अद्याप अनिश्चित आहे. त्यामुळे महिला आरक्षण आम्हाला कसं मिळणार आहे? जनगणनेसाठी किंवा मतदारसंघ पुनर्रचनेची कोणतीही तारीख ठरलेली नाही. त्यासाठी तारीख आणि वेळ काय आहे, असा माझा सरकारला प्रश्न आहे.
काल विरोधकांनी जे प्रश्न विचारले होते तेच प्रश्न भाजपनाचे खासदार निशिकांत दुबे यांनी उपस्थित केले होते. आपण ओबीसी आरक्षण का मागू नये? हीच सुवर्णसंधी आहे. आपण मोठ्या मनानं संसदेच्या विशेष अधिवेशनात एससी, एसटी, ओबीसींसाठी घटनादुरुस्ती करूया. आपण कटिबद्ध असल्याचा राष्ट्राला संदेश देऊ. जर त्यांचा दृष्टिकोन वेगळा असेल, तर भाजपानं तशी भूमिका स्पष्ट करावी-खासदार सुप्रिया सुळे
महिला खासदारांची संख्या 82 वरून 181 होणार- केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी मंगळवारी महिलांना लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये 33 टक्के आरक्षण देणारे नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयक संसदेत मांडल आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर 543 सदस्यीय लोकसभेत महिलांची संख्या सध्या 82 वरून 181 होणार आहे. द्रमुकचे सदस्य टी सुमथी यांनी महिला आरक्षण विधेयकाला हिंदीत नाव देण्यावरून प्रश्न उपस्थित केला. संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना का बोलावले नाही, असा प्रश्नही तिने केला. समाजवादी पक्षाच्या सदस्या डिंपल यादव यांनी महिला आरक्षण विधेयकात मागासवर्गीय, एससी, एसटी आणि अल्पसंख्याक समाजातील महिलांना आरक्षण देण्याची जोरदार मागणी केली.
- तत्कालीन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मे २०२२ मध्ये खासदार सुप्रिया सुळेंबाबत वक्तव्य करताना जीभ घसरली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चंद्रकात पाटील यांच्या वक्तव्याविरोधात राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात केली होती.
हेही वाचा-
- Womens Reservation Bill : महिला आरक्षण विधेयकाला सोनिया गांधींचा पाठिंबा, पण.....
- Parliament Special Session 2023 : महिला आरक्षण आजपासून लागू व्हावे-राहुल गांधी