नवी दिल्ली -मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत ईडीकडून केली ( Supreme court will pronounce verdict on PMLA ) जाणारी अटक, जप्ती आणि तपासाची प्रक्रिया कितपत ( PMLA provisions news ) योग्य आहे, यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यात सर्वोच्च न्यायालयाने पीएमएलए कायद्यातील विविध तरतुदींची वैद्यता कायम ठेवली आहे. त्यामुळे, ईडीच्या अधिकारांवर शिक्कामोर्तब झाला आहे. ईडीच्या अधिकारांसंदर्भात एकूण 242 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री अनिल देशमुख यांचाही याचिकाकर्त्यांमध्ये समावेश आहे.
हेही वाचा -Video : बाप रे.. तब्बल ७.५ फूट उंचीचा जवान.. सेल्फी घेण्यासाठी नागरिकांची उडतेय झुंबड..
मूलभूत अधिकारांचे उल्लंघन - न्यायमूर्ती ए.एम खानविलकर, न्यायमूर्ती सी.टी रविकुमार आणि न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणावर निर्णय होणार आहे. पीएमएलएच्या तरतुदी मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करत असल्याचा याचिकाकर्त्यांचा आरोप आहे. युक्तिवादादरम्यान कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी आणि मुकुल रोहतगी या ज्येष्ठ वकिलांनी आपापली बाजू मांडली होती.