नवी दिल्ली: Supreme Court Live: सर्वोच्च न्यायालय मंगळवारपासून आपल्या घटनापीठाच्या कार्यवाहीचे थेट प्रक्षेपण सुरू करणार constitution bench proceedings live आहे. हे प्रक्षेपण https://webcast.gov.in/scindia/ वर पाहता येईल. सर्वोच्च न्यायालय तीन वेगवेगळ्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठांचे थेट प्रक्षेपण constitution bench proceedings live करेल. मुख्य न्यायमूर्ती UU ललित नोकरी आणि शिक्षणातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) 10 टक्के कोट्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी सुरू ठेवतील.
न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड हे दिल्ली आणि केंद्र सरकारमध्ये सुरू असलेल्या वादात सेवा नियंत्रणाशी संबंधित प्रकरणाची सुनावणी करणार आहेत. तसेच, न्यायमूर्ती संजय किशन कौल यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांचे खंडपीठ ऑल इंडिया बार परीक्षेच्या वैधतेवर सुनावणी करणार आहे.