महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Gyanvapi area Survey : सर्वेक्षणाविरोधात ज्ञानवापी मशीद व्यवस्थापनेच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

वाराणसी येथील ज्ञानवापी-श्रृंगार गौरी परिसराच्या सर्वेक्षणाविरोधात ( Gyanvapi area Survey ) ज्ञानवापी मशीद व्यवस्थापनेच्या याचिकेवर ( Gyanvapi masjid committee petition news ) आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

By

Published : May 17, 2022, 7:44 AM IST

supreme court
र्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली -वाराणसी येथील ज्ञानवापी-श्रृंगार गौरी परिसराच्या सर्वेक्षणाविरोधात ( Gyanvapi area Survey ) ज्ञानवापी मशीद व्यवस्थापनेच्या याचिकेवर ( Gyanvapi masjid committee petition news ) आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

हेही वाचा -अबब..! गुजरातमधील 95 वर्षीय वृद्ध ठरला सर्वात जास्त काळ पेन्शनधारक, 58 वर्षांपासून घेत आहे पेन्शन

वारणसीतील एका न्यायालयाने ज्या सर्वेक्षण परिसरात सर्वेक्षण ( Gyanvapi Masjid Survey ) दलाला कथितरित्या शिवलिंग मिळाले तो परिसर सिल करण्याचे निर्देश सोमवारी दिले होते. या महत्वाच्या घडामोडीनंतर आज ( Gyanvapi masjid committee petition at supreme court ) सदर याचिकेवर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या मंगळवारच्या कामकाजाच्या सूचीनुसार, न्यायमूर्ती डी.वाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पीए.स नरसिंह यांच्या खंडपीठासमोर वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीची प्रकरणे पाहणाऱ्या 'अंजुमन इंतेजामिया मस्जिद' या व्यवस्थापन समितीच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश एनव्ही रमण यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने शुक्रवारी दिलेल्या लेखी आदेशात न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर याचिकेला सूचीबद्ध करण्याचे आदेश देण्यात आले होते.

मंदिर पाडून मशीद बांधल्याचा दावा - सन 1991 मध्ये काशी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशीद वादाची पहिली ठिणगी पडली. वाराणसी येथील जिल्हा न्यायालयामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेमध्ये वाराणसी शहरामधील चौक परिसरात असणारी ज्ञानवापी मशीद ही अनधिकृत असल्याचा दावा करण्यात आला होता. मशिदीच्या जागी आधी मंदिर होतं, मुघल बादशाह औरंगजेबने आपल्या कार्यकाळामध्ये हे मंदिर पाडून येथे मशीद बांधल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला होता. ही याचिका वाराणसीच्या विजय शंकर रस्तोगी यांनी दाखल केली होती.

रविवारी झालेल्या पाहणी प्रक्रियेत रंजक माहिती समोर -शृंगार गौरी प्रकरणी खटला दाखल करणारे विश्व वैदिक हिंदू महासंघाचे प्रमुख डॉ. हरिशंकर जैन यांच्या म्हणण्यानुसार, रविवारी झालेल्या पाहणी प्रक्रियेत रंजक माहिती समोर आली आहे. ज्यामुळे हिंदू पक्षाची बाजू अधिक मजबूत झाली आहे. मशीद प्राधिकरणाच्या आक्षेपानंतरही सर्वेक्षण सुरू ठेवण्याच्या आणि 17 मे पर्यंत अहवाल सादर करण्याच्या वाराणसी दिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार हे सर्वेक्षण केले जात आहे. दिवाणी न्यायालयाने या जागेचे सर्वेक्षण आणि व्हिडिओग्राफी करण्यासाठी कोर्ट कमिशनरची नियुक्ती केली होती. त्याला अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. मात्र, २१ एप्रिल रोजी अपील फेटाळण्यात आली. उच्च न्यायालयाच्या २१ एप्रिलच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. पाच महिलांनी शृंगार गौरीच्या दैनंदिन पूजेला परवानगी मिळावी यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. जे काशी विश्वनाथ मंदिर होते ते ज्ञानवापी मशिदीच्या आवारात वसले असल्याचा दावा केला जातो आहे.

हेही वाचा -IPL 2022: दिल्ली कॅपिटल्सकडून पंजाब किंग्सचा पराभव.. दिल्ली 17 धावांनी जिंकली.. 'अशा'प्रकारे पंजाबने हरली मॅच

ABOUT THE AUTHOR

...view details