महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Maoist Links Case: प्राध्यापक जीएन साईबाबांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका.. दोषमुक्त करण्याच्या आदेशाला स्थगिती - Discharge Professor GN Saibaba in Maoist Links

माओवाद्यांशी संबंध प्रकरणी प्राध्यापक जीएन साईबाबा यांना दोषमुक्त करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती (GN Saibaba acquittal Judgment cancelled) दिली. (SC suspends Mumbai HC order on Maoist Saibaba)

Supreme Court Suspends Bombay High Courts Nagpur Bench Order to Discharge Professor GN Saibaba in Maoist Links Case
प्राध्यापक जीएन साईबाबांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका.. दोषमुक्त करण्याच्या आदेशाला स्थगिती

By

Published : Oct 15, 2022, 12:50 PM IST

Updated : Oct 15, 2022, 1:20 PM IST

नवी दिल्ली :माओवाद्यांशी संबंध प्रकरणी प्राध्यापक जीएन साईबाबा यांना दोषमुक्त करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती (GN Saibaba acquittal Judgment cancelled) दिली. (SC suspends Mumbai HC order on Maoist Saibaba)

अतिरेकी संघटनांशी संबंध असल्याचा आरोप - मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ( Nagpur bench of the Bombay High Court ) दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जीएन साईबाबा आणि इतर ५ जणांना प्रतिबंधित अतिरेकी संघटनांशी संबंध असल्याच्या आरोपातून शुक्रवारी निर्दोष ( former Delhi University professor G N Saibaba ) मुक्तता केली होती. देशविरोधी कारवायांसाठी गडचिरोली न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

सुटका करण्याचा होते आदेश -मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जी एन साईबाबा यांची माओवादी संबंधांच्या कथित प्रकरणातून निर्दोष मुक्तता करत त्यांची तात्काळ तुरुंगातून सुटका करण्याचे आदेश दिले होते. न्यायमूर्ती रोहित देव ( division bench of Justice Rohit Deo ) आणि अनिल पानसरे यांच्या खंडपीठाने साईबाबाने त्याला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या ट्रायल कोर्टाच्या 2017 च्या आदेशाला आव्हान देणारे अपील मंजूर केले होते. खंडपीठाने या प्रकरणातील अन्य पाच दोषींच्या अपीललाही परवानगी दिली आणि त्यांची निर्दोष मुक्तता केली होती.

मार्च 2017 मध्ये झाली होती अटक --मार्च 2017 मध्ये, महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील सत्र न्यायालयाने साईबाबा आणि इतरांना, पत्रकार आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (JNU) विद्यार्थ्यासह कथित माओवादी संबंध आणि देशाविरुद्ध युद्ध पुकारल्याच्या कृतीत सहभागी झाल्याबद्दल दोषी ठरवले होते. न्यायालयाने साईबाबा आणि इतरांना कठोर बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा (UAPA) आणि भारतीय दंड संहिता (IPC) च्या विविध तरतुदींनुसार दोषी ठरवले होते.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

Last Updated : Oct 15, 2022, 1:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details