नवी दिल्ली : भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने पैगंबर यांच्यावर केलेल्या टिप्पणीप्रकरणी जोरदार फटकारले आहे. सुप्रीम कोर्टाने नुपूर शर्माला संपूर्ण देशाची माफी मागण्यास सांगितले ( Supreme Court Ordered Nupur Sharma To Apologized ) आहे. उदयपूरमधील एका शिंप्याची हत्या झालेल्या दुर्दैवी घटनेला त्यांचे वक्तव्य जबाबदार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे आहे. नुपूर शर्माची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील मनिंदर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, मी या टिप्पणीबद्दल माफी मागितली आहे आणि टिप्पण्या मागे घेतल्या आहेत.
नुपूर शर्माच्या वक्तव्याने देश पेटला :देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, त्यांनी आणि त्यांच्या वक्तव्याने संपूर्ण देश पेटला आहे. त्याच वेळी, कोर्टाने म्हटले आहे की, टीव्ही चॅनल आणि नुपूर शर्मा यांनी अशा प्रकरणाशी संबंधित कोणत्याही अजेंडाचा प्रचार करू नये, जे न्यायालयाच्या अधीन आहे.