नवी दिल्ली सर्वोच्च न्यायालयाने गुजरात दंगल प्रकरणी अटक करण्यात आलेल्या कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड Supreme Court grants interim bail to activist Teesta Setalvad यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. २००२ च्या गुजरात दंगलीत Gujarat Riots Case 2002 निष्पाप लोकांना फसवण्यासाठी कागदपत्रे बनवल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली होती. शिवाय न्यायालयाने त्यांना तपासात सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहे.
तीस्ता सेटलवाड यांना जूनमध्ये अटककरण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी सेटलवाड यांच्या जामीन अर्जाची यादी करण्यास झालेल्या विलंबावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाडच्या जामीन याचिकेवर राज्य सरकारला नोटीस पाठवल्यानंतर सहा आठवड्यांनंतर गुजरात उच्च न्यायालयाने 19 सप्टेंबर रोजी सुनावणीसाठी का सूचीबद्ध केले, असा सवाल न्यायालयाने केला होता. न्यायालयाने राज्य सरकारला अशी प्रथा आहे का, याची माहिती शुक्रवारी दुपारी 2 वाजेपर्यंत देण्यास सांगितले होते. मुख्य न्यायमूर्ती उदय उमेश ललित, न्यायमूर्ती एस रवींद्र भट्ट आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठाने सेटलवाड यांच्या याचिकेवर शुक्रवारी पुढील सुनावणी निश्चित केली.