नवी दिल्ली : पंढरपूरमध्ये होणाऱ्या वार्षिक आषाढी एकादशी यात्रेत केवळ दहा पालख्यांना परवानगी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे.
आषाढी वारी 2021 : कोरोनामुळे पंढरपुरात गर्दी नकोच, सर्वोच्च न्यायालयाकडून राज्य सरकारचा निर्णय कायम - संत नामदेव महाराज संस्थान
सरन्यायाधीश एन व्ही रमण्णा, न्यायमूर्ती ए एस बोपन्ना आणि न्यायमूर्ती ह्रषिकेश रॉय यांच्या खंडपीठाने याचिकेवर सुनावणीस स्पष्ट नकार देताना ही याचिका फेटाळून लावली आहे. संत नामदेव महाराज संस्थानने ही याचिका दाखल केली होती. याचिकेतून राज्य सरकारच्या निर्णयाला संस्थानने आव्हान दिले होते.
सरन्यायाधीश एन व्ही रमण्णा, न्यायमूर्ती ए एस बोपन्ना आणि न्यायमूर्ती ह्रषिकेश रॉय यांच्या खंडपीठाने याचिकेवर सुनावणीस स्पष्ट नकार देताना ही याचिका फेटाळून लावली आहे. संत नामदेव महाराज संस्थानने ही याचिका दाखल केली होती. याचिकेतून राज्य सरकारच्या निर्णयाला संस्थानने आव्हान दिले होते. कोरोनाची स्थिती पाहता आषाढी यात्रेसाठी केवळ दहा पालखींना दिंडी मार्गाने जाण्याची परवानगी राज्य सरकारने दिली होती. राज्य सरकारचा निर्णय वारकऱ्यांच्या मुलभूत अधिकारांवर गदा आणणारा असल्याचा युक्तिवाद संस्थानने याचिकेतून केला होता. वारकऱ्यांना वारीला जाण्याची परवानगी याचिकेतून मागण्यात आली होती. मात्र कोर्टाने याला स्पष्ट नकार दिला आहे.
हेही वाचा -आषाढीवारी: अलंकापुरीतून टाळ - मृदुंगाच्या निनादात माऊलींच्या पादुका पंढरपूरकडे मार्गस्थ