नवी दिल्ली - राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 30 जून रोजी सभागृहात बहुमत सिद्ध करण्याच्या निर्देश दिले होते. याला शिवसेनेचे मुख्य व्हीप सुनील प्रभू यांनी दाखल केली होती. यावर याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने फ्लोअर टेस्ट संदर्भात महत्त्वाचा निर्णय दिला. न्यायालयाने तिन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निकाल देण्यासाठी अर्ध्या तास घेतला होता. त्यांनतर सर्वोच्च न्यायालयाने उद्याच बहुमत चाचणी घेण्यात यावी, ( SC Decision About Assembly Floor Test ) असा निर्णय दिला आहे. ( Supreme Court on Maha Vikas Aghadi petition ) ( supreme court decision on Thursday Assembly Floor Test )
सुप्रिम कोर्ट -सर्वोच न्यायालयाने शिवसेनाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांना विचारले की, आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा आमच्यासमोर प्रलंबित आहे, पण त्याचा फ्लोअर टेस्टशी काय संबंध याबाबत थोडे स्पष्टीकरण द्यावे.
शिवसेनेच्या अधिकृत गटाची बाजू ज्येष्ठ वकील डॉ. अभिषेक मनु सिंघवी हे न्यायालयात मांडत आहेत. त्यांनी न्यायालयात अपात्रतेच्या कारवाईच्या वैधतेचा विचार करत आहे आणि हे प्रकरण 11 जुलै रोजी सुनावणीसाठी ठेवले आहे. अपात्रतेचा मुद्दा फ्लोर टेस्टच्या मुद्द्याशी थेट जोडलेला/आंतरसंबंधित आहे. असे उत्तर दिले. त्यांनी 34 आमदारांनी केलेल्या स्वाक्षरीच्या पत्रावरून हा युक्तीवाद सुरु आहे.
सुप्रिम कोर्ट - सगळेच निर्णय राज्यपाल्यांवर सोडू नयेत, काही निर्णय विधानमंडळावर घ्यावेत.
अॅड. अभिषेक मनु सिंघवी - हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयासमोर निकालाच्या प्रतीक्षेत असताना, नुकतेच कोविडमधून बरे झालेले राज्यपाल, विरोधी पक्षनेत्यांच्या भेटीनंतर दुसऱ्या दिवशी फ्लोअर टेस्टची मागणी कशी करू शकतात? ज्या आमदारांनी पक्षाविरोधात भूमिका घेतली. ते लोकांच्या इच्छेचे प्रतिनिधित्व करू शकत नाहीत. उद्या फ्लोर टेस्ट न घेण्याबाबत राज्यपाल न्यायालयावर विश्वास ठेवू शकत नाहीत का? उद्या फ्लोर टेस्ट झाली नाही तर आभाळ कोसळेल का? अपात्रतेच्या निर्णयापूर्वी बहुमत चाचणी नको, शिवसेनेच्या वकिलाचा जोरदार युक्तीवाद न्यायालयात सुरु आहे.
अॅड. अभिषेक मनु सिंघवी -शिवराज सिंघ चव्हाण यांच्याविरोधातील मध्यप्रदेशातील 2020 मधील प्रकरणाचा दाखला देण्यात आला आहे. या प्रकरणात राज्यपालांनी तातडीची बैठक बोलवली होती.
शिंदे गटाचे वकील अॅड. निरज किसन कौल - कोर्टाने स्थगिती देण्याचा प्रश्न नाही, तुमच्या योग्यतेवर प्रश्नचिन्ह असल्याने तुम्ही या प्रकरणाला सामोरे जाऊ शकत नाही असा प्रश्न आहे, असा युक्तीवाद त्यांनी केला.
न्यायमुर्ती कांत - सर्वप्रथम उपाध्यक्षावरील अविश्वास ठरावच्या प्रस्तावाबद्दल निर्णय घेणे महत्त्वाचे आहे.
अॅड. निरज किसन कौल -अपात्रतेच्या कारवाईचा काहीही परिणाम होत नाही. लोकशाहीत घडणारी सर्वात आरोग्यदायी गोष्ट म्हणजे फ्लोअर टेस्ट आहे. मुख्यमंत्री यांच्याकडे विधानमंडळामध्ये बहुमत तर दूर त्यांच्या स्वत:च्या पक्षाच्या बहुमत नाही असा व्यक्तीवाद त्यांनी केला.
अॅड. निरज किसन कौल - मी प्रत्येकजण फ्लोअर टेस्ट देण्यासाठी उत्सुक असल्याचे पाहिले आहे. मी क्वचितच एखादी पार्टी फ्लोअर टेस्ट करायला घाबरलेली पाहिली आहे.
अॅड. निरज किसन कौल - बेकायदेशीर आणि असमाधानकारक राजकीय सौदेबाजी टाळण्यासाठी न्यायालयाने हस्तक्षेप केला होता असा युक्तीवाद शिवराज सिंह चौहान यांच्या मध्यप्रदेशातील प्रकरणाबाबत खुलासा करताना ते म्हणाले.
अॅड.निरज किसन कौल - फ्लोअर टेस्टपेक्षा सरकारला कोण पाठिंबा देत आहे हे ठरवण्यासाठी लोकशाहीत आणखी चांगली जागा असू शकते का?, एकच युक्तिवाद असा आहे की तुमच्या उपाध्यक्षांना नोटीस बजावली असल्याने फ्लोअर टेस्ट पुढे ढकलली पाहिजे, असा युक्तीवाद त्यांनी मांडला आहे.
न्यायमुर्ती कांत - न्यायालयाने उपाध्यक्षांना नोटीस नाही तर अंतरिम आदेश दिलेले आहेत असे न्यायालयाने सांगितले.
अॅड. निरज किसन कौल - राज्यात उलगडलेल्या परिस्थितीसाठी फ्लोअर टेस्ट आवश्यक आहे आणि राज्यपालांनी त्यांच्या विवेकबुद्धीनुसार निर्णय घेतला आहे. प्रसारमाध्यमे देखील माहितीचा अविभाज्य स्त्रोत आहे.
अॅड. निरज किसन कौल -राज्यपाल दोन दिवसांपूर्वीच कोविडमधून बरे झाले हा कोणत्या प्रकारचा युक्तिवाद आहे? मग आजारातून बरे झालेल्या व्यक्तीने आपली घटनात्मक कर्तव्ये पार पाडू नयेत?
अॅड. निरज किसन कौल -राज्यपालांचा निर्णय न्यायालयीन पुनरावलोकनापासून मुक्त आहे, असे कोणीही म्हणत नाही. पण हे असे प्रकरण आहे का जिथे राज्यपालांच्या निर्णयाची जागा उपाध्यक्षांसोबत घेतली जाऊ शकते?
अॅड. निरज किसन कौल -नबाम रेबिया प्रकरणानुसार सभापती अजिबात निर्णय घेऊ शकत नाहीत. तर शिवराज सिंह चौहान यांच्या म्हणण्यानुसार, अपात्रता आणि फ्लोअर टेस्ट या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. त्यामुळे अपात्रता बाबतची याचिका प्रलंबित असल्यामुळे फ्लोअर टेस्ट पुढे ढकलता येत नाही. असे शेवटी निरज किसन कौव यांनी युक्तीवादात सांगितले आहे.
शिंदे गटाची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील मनिंदर सिंग - शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या गटाची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील मनिंदर सिंग यांनी युक्तिवाद सुरू केला. ते म्हणतात की सर्वोच्च न्यायालय जेंव्हा एवढ्या उशिरा बसले आहे, ते कधीही फ्लोर टेस्ट थांबवण्यासाठी नाही, तर फ्लोअर टेस्ट आयोजित करण्यासाठी आहे. फ्लोर टेस्ट थांबवण्याची विनंती करण्याची ही पहिलीच वेळ आहे. ज्येष्ठ वकील मनिंदर सिंग यांनी म्हणणे मांडले की, शिवसेनेकडे फक्त 16 आमदार आहेत. आमचे 39 आमदार आहेत.