नवी दिल्लीArticle 370 Removal Reaction : सर्वोच्च न्यायालयानं सोमवारी कलम ३७० हटवण्याचा निर्णय कायम ठेवला. हा सरकारचा अधिकार आहे, असं न्यायालयानं म्हटलंय. न्यायालयानं आपल्या निर्णयात सप्टेंबर २०२४ पर्यंत विधानसभा निवडणुका घेण्याचे आणि राज्याचा दर्जा बहाल करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, आता या निर्णयाबाबत सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.
हा निर्णय म्हणजे काँग्रेसच्या तोंडावर चपराक असल्याचं जेएनयूचे प्राध्यापक आनंद रंगनाथन म्हणाले. "मोदी सरकारचा हा निर्णय योग्य असून भारताचा मुकुट (जम्मू-काश्मीर) आता कोणत्याही काट्याशिवाय चमकेल", असं ते म्हणाले.
काही जणांनी पंतप्रधान मोदींचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. मोदींनी हे दुसऱ्याच कुठल्या संदर्भात म्हटलं आहे, मात्र इथे हा व्हिडिओ उपरोधिक म्हणून वापरण्यात आला.
परराष्ट्र व्यवहार तज्ञ सुशांत सरीन यांनी लिहिलं की, अखेर हे प्रकरण समाप्त झालं आहे.
भाजपाचे माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी या निर्णयाचं स्वागत केलं. "नेहरूंनी केलेल्या चुका आज सर्वोच्च न्यायालयानं दूर केल्या", असं ते म्हणाले.