नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने तीन महिला पैलवानांनी दाखल केलेली याचिका रद्द केली आहे. दिल्ली पोलिसांनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण यांच्याविरुद्धात प्राथमिक तक्रार दाखल केली आहे. यामुळे पैलवानांनी दाखल केलेली याचिका रद्द करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती पीएस नरसिंम्हा आणि न्यायमूर्ती जेबी पारदीवाला यांच्या पीठाने सांगितलं की, दाखल केलेल्या याचिकेत बृजभूषण शरण यांच्याविरुद्धात प्राथमिक तक्रार दाखल केली जात नाही,अशी तक्रार करण्यात आली होती. पण आता ही तक्रार दाखल करण्यात आल्याने या याचिकेचा उद्देश पूर्ण झाला आहे.
याचिक रद्द : दरम्यान याचिकाकर्त्यांची अजून काही तक्रार असेल तर ते कलम 482 सीआरपीसीच्या अंतर्गत दिल्ली न्यायालयात आव्हान करू शकतात असेही न्यायमूर्तींच्या पीठाने म्हटले आहे. महिला पैलवानांनी बृजभुषण यांच्यावर केलेल्या आरोप प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली आहे. या प्रकणात सर्वोच्च न्यायालय दखल घेईपर्यंत पोलिसांनी केलेलं वर्तन बघता न्यायालयाने या चौकशीवर लक्ष्य द्यावे, अशी विनंती याचिकाकर्तांचे वरिष्ठ वकील नरेंद्र हुड्डा यांनी केली होती. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका रद्द केली आहे. याचिक रद्द करताना न्यायालयाने म्हटले की, न्याय दंडाधिकारी या कलम 482 सीआरपीसी अंतर्गत दिल्ली उच्च न्यायालयात याविषयी आव्हान देऊ शकतात.