नवी दिल्ली - तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचे ‘टार्गेट’ दिल्याचा खळबळजनक आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना येथील दंडाधिकारी न्यायालयाने बुधवारी फरार घोषित केले. आज सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court of India) फरार असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ( Parambir Singh ) यांना त्यांचा ठावठिकाणा उघड करण्यास सांगितले आहे आणि म्हटले आहे की ते देशाच्या किंवा जगात कोणत्या भागात आहेत हे सांगल्यानंतरच अटकेपासून संरक्षणासाठी सिंग यांच्या याचिकेवर सुनावणी होईल.
ठिकाणाबद्दल माहिती दिल्यानंतरच सुनावणी, सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंगांना फटकारले - 100 crore recovery case
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Former Mumbai Police Commissioner Param Bir Singh)यांना त्यांचा ठावठिकाणा उघड करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court of India) दिले आहेत.
परमबीर सिंग यांची कारकीर्द-
परमबीर सिंग हे 1988 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून सिंग यांची ओळख आहे. गेली अनेक वर्षे वेगवेगळ्या सरकारमधील नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागापूर्वी त्यांनी ठाण्याचे आयुक्त म्हणून 2016 मध्ये काम पाहिले होते. ठाणे पोलीस आयुक्त असताना त्यांच्या टीमने मीरारोड भागात फेक कॉलसेंटर छापा मारला होता.
भारतातील या सर्वांत मोठ्या फेक कॉलसेंटरच्या तपासासाठी एफबीआयची टीम भारतात आली होती. त्यांच्याच कार्यकाळात अंडरवर्ल्ड डॉन दाउद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला ठाणे खंडणी विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या होत्या. त्यानंतर त्यांना राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कायदा व सुव्यस्थेचा यापदी नेमण्यात आले. अतिरिक्त पोलीस महासंचालक असताना कोरेगाव भीमा (bhima koregaon case) प्रकरणात त्यांनी स्वतः लक्ष घालत हे प्रकरण हाताळले होते. गेल्यावर्षीच त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून नेमण्यात आले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना सिंचन घोटाळ्यात क्लिनचिट सिंग यांनीच दिली होती.