नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ( BCCI ) अध्यक्ष सौरव गांगुली ( BCCI President Sourav Ganguly ) आणि सचिव जय शाह ( BCCI Secretary Jai Shah ) यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला ( SC relief to Jai Shah and Sourav Ganguly )आहे. दोघेही पुढील तीन वर्षे बीसीसीआयमध्ये त्यांच्या पदावर राहू शकतात. बीसीसीआयच्या घटनेत सुधारणा करण्यासंदर्भातील ( SC allows for BCCI constitution change 0 याचिकेवर बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. म्हणजेच बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह यांच्या कार्यकाळावर कोणतेही संकट नाही.
सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, बीसीसीआयच्या एका टर्मनंतर कुलिंग ऑफ पीरियड ( Cooling off period ) आवश्यक नाही, परंतु तो दोन टर्मनंतर करावा लागेल. सौरव गांगुली आणि जय शाह येत्या तीन वर्षांसाठी त्यांच्या पदावर राहू शकतात हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरून स्पष्ट झाले आहे.
गांगुलीचा कार्यकाळ ( Sourav ganguly tenure ) कधी संपत होता?
टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने 23 ऑक्टोबर 2019 रोजी बीसीसीआय अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली, तर जय शाह ( Jay shah tenure ) 24 ऑक्टोबर 2019 रोजी बीसीसीआय सचिव झाले. अशा परिस्थितीत या दोघांचा कार्यकाळ पुढील महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर 2022 मध्ये संपत होता. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाशी संबंधित याचिकेवर लवकर सुनावणीसाठी बीसीसीआयकडून अपील करण्यात आली होते.
आता दोघांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे, त्यामुळे दोघेही 2025 पर्यंत त्यांच्या पदावर राहू शकतात. सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय फक्त बोर्ड अध्यक्ष आणि बोर्ड सेक्रेटरीच नाही तर बीसीसीआय आणि स्टेट असोसिएशनच्या सर्व अधिकारी/पदांसाठी आहे.