बिहार :बिहारमधील गयामध्ये एका महिलेला चेटकीन म्हणत जिवंत जाळण्यात ( woman called witch and burned alive ) आले. यात महिलेचा मृत्यू झाला. ही हृदय पिळवटून टाकणारी घटना इमामगंज पोलीस स्टेशन परिसरातील आहे. महिलेवर चेटकीन असल्याचा आरोप करून आधी प्राणघातक हल्ला करण्यात आला. नंतर कापडात गुंडाळून जिवंत जाळण्यात ( Wrapped cloth burned alive) आले. तिचे संपूर्ण घरही जाळण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस पोहोचले असता त्यांच्यावरही हल्ला करण्यात ( villagers attack police )आला.
मॉब लिंचिंग :झारखंडमधील ओझा गुणी यांचे पथक मगरा पोलीस स्टेशनच्या पचमाह गावात पोहोचले होते. गावातील परमेश्वर भारती यांच्या मृत्यूनंतर हेमंती देवी नावाच्या महिलेवर डायन असल्याचा आरोप करण्यात आला होता. या महिलेने चेटकीन होऊन परमेश्वर भारतीची हत्या केल्याचे सांगण्यात आले. यासाठी ग्रामस्थांनी अनेकवेळा हेमंतीदेवींचे घर गाठले. अनेक प्रयत्नांनंतर गावकऱ्यांच्या जमावाने हेमंतीदेवीच्या घरात घुसून तिला ओढत बेदम मारहाण ( Beating into house ) केली. त्यानंतर खोलीतच जिवंत जाळले. जिवंत जाळण्यापूर्वी तिच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.
गावकऱ्यांचा पोलिसांवरही हल्ला : मॉब लिंचिंगच्या ( Mob lynching ) घटनेपूर्वी माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पण लोक अंधश्रद्धेने इतके चिडले की त्यांनी पोलिसांच्या पथकावर हल्ला केला. या हल्ल्यात अनेक पोलीस जखमी झाले. नंतर पोलिसांचे पथक पुन्हा पोहोचले, मात्र तोपर्यंत घटना घडली होती. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. मृत हेमंती देवीचा मुलगा सोनू कुमार याने संपूर्ण घटनाक्रम सांगितला.