हैदराबाद : इंडियन प्रीमियर लीग 2023 चा चौथा सामना आज हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादचा ७२ धावांच्या फरकाने पराभव केला. युजवेंद्र चहलने सामन्यात 4 विकेट घेतल्या. याच सामन्यात सनरायझर्स हैदराबादचे नेतृत्व भुवनेश्वर कुमारकडे होते. कारण हैदराबादचा एडन मार्कराम नेदरलँड्सविरुद्धच्या दोन एकदिवसीय मालिकेमुळे दक्षिण आफ्रिकेत होता. मात्र, तो आज भारतात पोहोचला आहे. त्याचवेळी संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करत आहे. सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा पराभव :राजस्थान रॉयल्सने आयपीएल 2023 ची सुरुवात विजयाने केली आहे. या संघाने आपल्या पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा ७२ धावांनी पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, कर्णधार संजू सॅमसन यांच्या अर्धशतकांच्या जोरावर पाच विकेटच्या मोबदल्यात 203 धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादचा संघ 8 विकेट गमावून केवळ 131 धावाच करू शकला. हैदराबादकडून अब्दुल समदने सर्वाधिक नाबाद 32 धावा केल्या. त्याचवेळी राजस्थानकडून चहलने चार तर, बोल्टने दोन विकेट घेतल्या.
स्टार खेळाडूंवर दोन्ही संघांची नजर : या लीगमध्ये प्रथमच दोन्ही संघ मैदानात आहेत. राजस्थानच्या स्टार खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर, या संघाच्या चाहत्यांना यजुवेंद्र चहल, जोस बटलरकडून खूप आशा आहेत. त्याचबरोबर संघात आर अश्विन, अॅडम झाम्पासारखे फिरकीपटूही आहेत. त्याचबरोबर जो रूट, शिमरेन हेटमायर, जेसन होल्डर यांच्याकडून स्फोटक फलंदाजी प्रेकशकांना पहायला मिळते आहे. हैदराबाद संघाबद्दल बोलायचे तर, ग्लेन फिलिप्स, उमरान मलिक यांच्याकडून संघाला विजयकाडे नेण्याची धुरा आहे. दुसऱ्या डावात ट्रेंट बोल्टने पहिल्याच षटकात हैदराबादला दोन धक्के दिले. या षटकात अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी खाते न उघडता बाद झाले. यानंतर हैदराबादच्या संघाला सावरायला वेळ मिळाला नाही.