शिमला : सुखविंदर सिंह सुक्खू (Sukhvinder Singh Sukhu) हे हिमाचलचे नवे मुख्यमंत्री असतील. काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सुक्खू यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सुक्खू यांची पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. काँग्रेस हायकमांडने आधीच सुक्खू यांच्या नावाला मंजुरी दिली होती. त्यानंतर आज हिमाचल विधानसभेत झालेल्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा करण्यात आली. (Himachal Pradesh new CM) (CM Face of Himachal Congress) (Himachal Congress Legislature Party meeting) (Himachal CLP Leader)
सीआर ते सीएमपर्यंतचा प्रवास : एचपीयूमधून पदवीधर आणि एलएलबी केलेल्या सुखविंदर सुक्खू यांनी हिमाचल प्रदेश विद्यापीठातून विद्यार्थी राजकारणाला सुरुवात केली होती. कॉलेजच्या राजकारणात सीआर म्हणजेच वर्ग प्रतिनिधी म्हणून सुरुवात करणारे सुखविंदर सिंग सुखू आता हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री बनणार आहेत. त्यांच्या महाविद्यालयीन वर्गापासून ते काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवडून येण्यापर्यंत त्यांची दीर्घ राजकीय कारकीर्द आहे. 1988 ते 1995 पर्यंत ते NSUI चे प्रदेशाध्यक्षही राहिले आहेत. (सुखविंदर सिंग सुखू) (एचपी सीएलपी लीडर)