महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Mustache Of CM : आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांच्या मिशा अन् सध्याच्या मुख्यमंत्र्यांच्या मिशांची चर्चा; 'हे' आहे वेगळेपण - Mustache Of Himachal CM

सुखविंदर सिंह सुक्खू यांनी हिमाचलचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताच राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच जाड मिशी असलेला मुख्यमंत्री बनला आहे. यापूर्वीचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर हे देखील मिशा ठेवत असले तरी ते हलक्या मिशा ठेवायचे. (CM of Himachal with mustache) (Himachal new CM Sukhvinder Singh Sukhu)

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Dec 11, 2022, 10:21 PM IST

शिमला :हिमाचल प्रदेशचे नवे मुख्यमंत्री म्हणून सुखविंदर सिंह सुक्खू यांनी शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी सुक्खू यांना मुख्यमंत्री आणि मुकेश अग्निहोत्री यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. सुखविंदर सिंह सुक्खू मुख्यमंत्री होताच राज्याच्या राजकारणात एक नवा अध्याय जोडला गेला आहे. हिमाचलला पहिल्यांदाच जाड मिशी असलेला मुख्यमंत्री मिळाला आहे. सुखविंदर सिंह सुक्खूही त्यांच्या मिशीमुळे सध्या चर्चेत आहेत. (Sukhvinder Singh Sukhu) (CM of Himachal with mustache) (Himachal new CM Sukhvinder Singh Sukhu)

सुखविंदर सिंह सुक्खू

जयराम ठाकूर यांना मिशा काढण्याचा सल्ला दिला होता : या आधीचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनाही मिशी होती, पण ती खूप पातळ होती. आजपर्यंत हिमाचलच्या जनतेने पाहिलेले सर्व मुख्यमंत्री बिनमिशींचे होते. हिमाचलचे निर्माते आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंत परमार, रामलाल ठाकूर, पहिले बिगरकाँग्रेस मुख्यमंत्री शांता कुमार किंवा प्रेमकुमार धुमाळ, या सर्वांना मिशा नव्हत्या. याशिवाय 6 वेळा मुख्यमंत्री राहिलेले वीरभद्र सिंह यांनीही मिशी ठेवली नव्हती. जयराम ठाकूर जेव्हा मुख्यमंत्री होण्याच्या शर्यतीत उतरले तेव्हा त्यांच्या समर्थकांनीही त्यांना मिशा काढण्याचा सल्ला दिला होता. मात्र मी मिशीशी तडजोड करू शकत नाही, असे जयराम ठाकूर म्हणाले होते. आता परिस्थिती बदलली आहे. काँग्रेस सत्तेवर आली आहे आणि मुख्यमंत्री सुखविंदर सिंह यांना जाड मिशा आहेत. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुक्खू हे जाड मिशा असलेले राज्याचे पहिले मुख्यमंत्री बनले आहेत. (list of himachal CM) (Chief Ministers of Himachal)

शांता कुमार, प्रेमकुमार धुमाळ आणि जयराम ठाकूर
यशवंत परमार, रामलाल ठाकूर आणि वीरभद्र सिंह

ABOUT THE AUTHOR

...view details