महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

सुखदेव सिंह गोगामेडींच्या हत्या करणाऱ्या दोन शूटर्सला चंदीगडमधून अटक, राजस्थानसह दिल्ली पोलिसांची कारवाई - एडीजी क्राईम दिनेश एमएन

Sukhdev Singh Gogamedi Murder : राष्ट्रीय राजपूत करणी सेना अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्याकांड प्रकरणात गोळीबार करणाऱ्या दोघांना दिल्ली पोलिसांनी अटक केलीय. नितिन फौजी आणि रोहित सिंह राठोड अशी त्यांची नावं आहेत.

sukhdev singh gogamedi murder case shooters navin fauji rohit singh rathore arrested from chandigarh
सुखदेव सिंह गोगामेडी हत्याकांडातील दोन्ही फरार शूटर्सना पकडण्यात आलं

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 10, 2023, 9:53 AM IST

Updated : Dec 10, 2023, 12:33 PM IST

जयपूर Sukhdev Singh Gogamedi Murder : राष्ट्रीय राजपूत करणी सेना अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी हत्याकांडातील दोन्ही फरार शूटर्सना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. राजस्थान आणि दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं संयुक्त कारवाईत नितीन फौजी आणि रोहित राठौर या दोघांना चंदीगड येथून अटक केली आहे. दोन्ही आरोपींना चंदीगडहून जयपूरला आणून त्यांची चौकशी केली जाणार आहे. एडीजी क्राईम दिनेश एमएन आणि जयपूरचे पोलीस आयुक्त बिजू जॉर्ज जोसेफ यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली.

जयपूरला होणार चौकशी : एडीजी क्राइम दिनेश एमएन यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीला मोठं यश मिळालंय. सुखदेव सिंह गोगामेडी यांच्यावर गोळीबार करणारे नितीन फौजी आणि रोहित राठोड यांना पकडण्यासाठी संयुक्त कारवाई करण्यात आली. राजस्थान एसआयटी आणि दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं चंदीगडमध्ये संयुक्त कारवाई करून दोन्ही हल्लेखोरांना पकडण्यात यश मिळवलंय. आरोपींना जयपूरला आणून चौकशी केली जाणार आहे.

5 लाख रुपयांचं बक्षीस :आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची वेगवेगळी पथकं राजस्थान, दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि इतर ठिकाणी शोध घेत होती. छापे टाकले जात होते. राजस्थान पोलीस इतर राज्यांच्या पोलिसांशी समन्वय साधून आरोपींचा शोध घेत होते. त्याचवेळी एनआयए, मिलिटरी इंटेलिजन्स आणि दिल्ली क्राइम ब्रँचचे पथकही आरोपींचा शोध घेत होते. दोन्ही आरोपींवर प्रत्येकी 5 लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आलं होतं.

  • शूटर्सना सहकार्य करणाऱ्याला अटक :याआधी पोलिसांनी दोन्ही शूटर्सना सहकार्य करणाऱ्या आरोपी रामवीर जाट (रा.महेंद्रगड, हरियाणा) याला अटक केली होती. रामवीर हा नितीन फौजीचा खास मित्र आहे. रामवीरने जयपूरमध्ये दोन्ही शूटर्सला साथ दिली होती.

रामवीरनं शूटर्ससाठी केली व्यवस्था-जयपूरचे पोलीस आयुक्त बिजू जॉर्ज जोसेफ यांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 डिसेंबर रोजी सुखदेव सिंह गोगामेडी यांची नितीन फौजी आणि रोहित राठोड या दोन शूटर्सनं श्याम नगर भागात अंदाधुंद गोळीबार करून हत्या केली होती. अटक आरोपी रामवीरनं जयपूरमध्ये शूटर नितीन फौजीसाठी संपूर्ण व्यवस्था केली होती. रामवीर सिंह जाट आणि नितीन फौजी यांची गावं जवळच आहेत. रामवीरने दोन्ही शूर्टसची जयपूरमधील एका फ्लॅटमध्ये राहण्याची व्यवस्था केली होती. घटनेनंतर, नितीन फौजी आणि रोहित राठोड यांना अजमेर रोडवरून मोटारसायकलवरून नेण्यात आलं. बागरू टोल प्लाझासमोरील नागौर डेपोतून राजस्थान रोडवेजच्या बसमध्ये बसवून पळ काढण्यात त्यांची मदत करण्यात आली.

प्रकरण काय :जयपूरच्या श्याम नगर पोलीस स्टेशन परिसरात मंगळवारी (5 डिसेंबर) दुपारी राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांच्यासह दोघांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दिवसाढवळ्या हल्लेखोरांनी घरात घुसून अंदाधुंद गोळीबार केला. सुखदेव सिंह गोगामेडी यांच्यावर चार गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. सुखदेव सिंह यांनी गोगामेडी यांना मानसरोवर येथील खासगी रुग्णालयात नेलं. तिथं डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. यावेळी नवीन सिंह नावाच्या तरुणाचाही गोळी लागल्यानं मृत्यू झाला. त्याचवेळी सुखदेव सिंह गोगामेडी यांचे खासगी सुरक्षा कर्मचारी अजित सिंह गंभीर जखमी झाले. त्यानंतर हल्लेखोरांनी तेथून पळ काढला.

हेही वाचा -

  1. सुखदेव सिंह गोगामेडी हत्या प्रकरणात मोठी अपडेट, एफआयआरमध्ये पोलीस अधिकाऱ्यासह काँग्रेसमधील सर्वात मोठ्या 'या' नेत्याचं नाव
  2. सुखदेव सिंह गोगामेडींच्या हत्येनंतर राजपूत समाज आक्रमक; आज 'राजस्थान बंद'ची हाक
  3. गोगामेडी हत्याकांडानंतर राजस्थान पेटलं, अनेक ठिकाणी तोडफोड; केंद्राकडून अतिरिक्त फौजफाटा मागवला
Last Updated : Dec 10, 2023, 12:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details