महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Sukesh Accused Kejriwal : केजरीवालांच्या सांगण्यावरून टीआरएस कार्यालयाला दिले 15 कोटी रुपये, लवकरच पुरावा देणार - सुकेश - अरविंद केजरीवाल

फसवणुकीच्या आरोपाखाली तुरुंगात बंद असलेल्या सुकेश चंद्रशेखर याने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. सुकेश याने यापूर्वीही पैशांच्या व्यवहाराबाबत केजरीवालांवर अनेक आरोप केले होते.

Sukesh Chandrasekhar
सुकेश चंद्रशेखर

By

Published : Mar 31, 2023, 2:49 PM IST

नवी दिल्ली :फसवणूक आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी तुरुंगात बंद गँगस्टर सुकेश चंद्रशेखरने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मोठा आरोप केला आहे. शुक्रवारी एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान पटियाला हाऊस कोर्टात पोहोचलेला सुकेश चंद्रशेखर याने माध्यमांशी बोलताना सांगितले की, अरविंद केजरीवाल यांच्या सांगण्यावरून 2020 मध्ये त्याने टीआरएस (तेलंगणा राष्ट्र समिती) कार्यालयाला 15 कोटी रुपये दिले होते.

सत्येंद्र जैन यांचा ऑडिओ प्रसिद्ध करणार : सुकेश म्हणाला की, अरविंद केजरीवाल आणि सत्येंद्र जैन यांनी त्याला तसे करण्यास सांगितले होते. या संदर्भात सत्येंद्र जैन यांच्याशी झालेल्या गप्पा मी या आठवड्यात प्रसिद्ध करणार असल्याचेही सुकेशने सांगितले. फसवणुकीच्या आरोपाखाली दिल्लीच्या मंडोली तुरुंगात बंद असलेल्या सुकेश चंद्रशेखरने यापूर्वीच अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांच्यावर अनेक आरोप केले आहेत.

आरोप बिनबुडाचे :मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना यासंदर्भात विचारणा केली असता ते म्हणाले की, हे सर्व आरोप बिनबुडाचे असून निवडणुकीच्या फायद्यासाठी ते भाजपच्या इशाऱ्यावर आरोप करत आहेत. दुसरीकडे भाजपने आपल्यावर कोणताही दबाव टाकला नसल्याचे सुकेश याने सांगितले आहे. यासोबतच तुरुंगात आपल्याला धमक्या दिल्या जात असून आपल्या जीवाला धोका असल्याचेही त्याने सांगितले होते. यामुळे कारागृह स्थलांतरित करण्याची मागणीही त्याने अनेकदा केली आहे.

यापूर्वीही झाले होते आरोप :सुकेश याने यापूर्वीही पैशांच्या व्यवहाराबाबत आरोप केले होते. त्याने एका फार्म हाऊसमधील पैशाच्या व्यवहाराबाबत सांगितले होते. सुकेश याने केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी उपराज्यपालांनी एक समितीही स्थापन केली होती. सुकेश याने समितीसमोर दावा केला होता की, त्यानी सत्येंद्र जैन यांना 60 कोटी रुपये रोख दिले होते. त्यापैकी 10 कोटी रुपये प्रोटेक्शन मनी होते, तर 50 कोटी पक्ष निधी म्हणून दिले होते. त्या बदल्यात त्याला राज्यसभेची जागा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

हेही वाचा :Old Currency Notes Seized : नोटबंदीच्या 6 वर्षांनंतर सापडले जुन्या नोटांचे घबाड! पहा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details