लखनऊ ( उत्तर प्रदेश ) : मनदीप कौर ( Mandeep Kaur Suicide in New York ) या भारतीय वंशाच्या (बिजनौरचे नजीबाबाद) 30 वर्षीय महिलेने अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये आत्महत्या केली आहे. मनदीपच्या मृत्यूचे कारण घरगुती हिंसाचार असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या 8 वर्षांपासून मनदीपचा पती रणजोधबीर संधू ( Bijnor Najibabad ) ( Mandeep Husband Ranjodhbir Sandhu )तिला मारहाण करीत होता. त्यानंतर ३ ऑगस्टला पीडितेने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी मनदीपने व्हिडीओ बनवून ( Mandeep Narrated his Pain by Video ) आपल्या व्यथा कथन केल्या आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी मनदीपच्या कुटुंबीयांनी नजीबाबाद कोतवाली येथे सासरच्यांविरोधात तक्रार दिली आहे. त्यांनी न्यायाधिकार्यांची भेट घेऊन आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मयत मनदीपला लग्न झाल्यापासून त्रास होता : वास्तविक आत्महत्या करणारी महिला नजीबाबाद कोतवाली भागातील बिरुवाला ताहारपूर गावातील रहिवासी जसपाल सिंह उर्फ बाबू यांची मुलगी आहे. मनदीप कौरचे लग्न शेजारच्या बडिया येथील रहिवासी मुखतियार सिंग यांचा मुलगा सिंग उर्फ रणजोधवीर याच्यासोबत 2015 साली झाले होते. मनदीप कौरच्या आई-वडिलांचा आरोप आहे की, लग्नाच्या काही महिन्यांनंतर रणजोधने पत्नी मनदीपला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याच्या या दडपशाहीची वृत्ती वाढतच राहिली, त्यामुळे कंटाळून मनदीपने आत्महत्या केली.
मुलाच्या जन्मानंतर मनदीप आणि रणजोध गेले होते न्यूयाॅर्कला : नातेवाइकांनी सांगितले की, नातवाच्या जन्मानंतर रणजोध आणि मनदीप नवजात मुलीसह टुरिस्ट व्हिसावर न्यूयॉर्कला गेले होते. तिथे रणजोधने आधी टॅक्सी चालवली, नंतर ट्रक घेतला आणि वाहतुकीचे काम सुरू केले. त्यानंतरही रणजोदचा मनदीपकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला नाही आणि तो दररोज तिच्यावर अत्याचार करीत राहिला. पतीच्या छळाला कंटाळून मनदीपने गळफास लावून आत्महत्या केली.