हैदराबाद : परीक्षेत कमी गुण मिळणे किंवा अनुत्तीर्ण होणे याचा अर्थ असा नाही की आपल्याला मोठे अपयश आले आहे. तेलंगणातील काही विद्यार्थ्यांनी कमी मार्कांमुळे आत्महत्या सामोहीक आत्महत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जगतियाला जिल्ह्यातील मेडीपल्ली येथील रहिवासी असलेल्या १६ वर्षीय विद्यार्थ्याने चार विषयात नापास झाल्याने, आत्महत्या केली. तो जगतियाला येथील एका खासगी महाविद्यालयात इंटरच्या पहिल्या वर्षात शिकत होता. असाच एक प्रकार निजामाबाद जिल्ह्यातील आरमूरमध्ये समोर आला आहे. येथे एका 17 वर्षीय विद्यार्थ्याने तीन विषयात नापास झाल्याने आत्महत्या केली. तो हैदराबादमधील एका कॉर्पोरेट संस्थेत इंटर प्रथम वर्ष (बीआयपीसी) शिकत होता.
रेल्वे स्थानकांदरम्यानच्या रुळांवर हा मृतदेह आढळून आला : तिरुपती येथील एक 17 वर्षीय विद्यार्थी ECIL रामकृष्णपुरम येथे राहत होता आणि पाटनचेरू येथे इंटरमिजिएट (MPC) करत होता. अपयशाने हताश होऊन तो सोमवारी सायंकाळी घरून निघाला आणि परत आलाच नाही. मंगळवारी सकाळी गुंडला पोचमपल्ली आणि मेडचल रेल्वे स्थानकांदरम्यानच्या रुळांवर हा मृतदेह आढळून आला. मात्र, त्याला परीक्षेत किती गुण मिळाले याची माहिती नाही. अशाच आणखी एका प्रकरणात, गढवाला मंडलमधील एका गावातील 17 वर्षीय विद्यार्थी हैदराबादमधील एका खाजगी महाविद्यालयात शिकत होता. एका विषयात अपयश आल्याने नाराज झालेल्या त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
विनायक नगर येथील घटना : प्रकाशम जिल्ह्यातील 17 वर्षीय विद्यार्थ्याने हैदराबादमधील एका खाजगी महाविद्यालयात इंटरमिजिएट (एमपीसी) चे शिक्षण घेतले. नापास झाल्याने त्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे. तसेच सिकंदराबाद येथील नेरेडमेट येथील विनायक नगर येथील विद्यार्थी एका खासगी महाविद्यालयात इंटरमिजिएटच्या द्वितीय वर्षात शिकत होता. एका विषयात नापास झाल्यानंतर त्याने राहत्या घरी गळफास घेतला.