महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

गोवा विधानसभेत सुदिन ढवळीकर यांचे आंदोलन; सरकार चर्चा टाळत असल्याचा केला आरोप - Sanjeevani Sugar Factory Discussion Goa

राज्यातील एकमेव धारबंदोडा तालुक्यातील संजीवनी साखर कारखान्याच्या विषयावर सरकारने चर्चा करणे टाळले. यामुळे मगोचे नेते सुदिन ढवळीकर यांनी सरकारचा निषेध करत सभागृहात जमिनीवर बसत ठिय्या आंदोलन केले.

Sudin Dhavalikar agitation Goa
गोवा विधानसभा सुदिन ढवळीकर

By

Published : Oct 19, 2021, 3:29 PM IST

पणजी (गोवा) -राज्यातील एकमेव धारबंदोडा तालुक्यातील संजीवनी साखर कारखान्याच्या विषयावर सरकारने चर्चा करणे टाळले. यामुळे मगोचे नेते सुदिन ढवळीकर यांनी सरकारचा निषेध करत सभागृहात जमिनीवर बसत ठिय्या आंदोलन केले.

विधानसभेतील दृश्य

हेही वाचा -उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत 40 टक्के महिलांना संधी देणार; प्रियंका गांधींची घोषणा

संजीवनी साखर कारखान्याच्या विषयवार चर्चा करण्यासाठी विषय विधानसभेच्या पटलावर आला असताना त्यावर विधानसभा अध्यक्षांनी बोलणे टाळले. यावेळी महाराष्ट्र गोमंतक पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर यांनी आक्रमकपणा दाखवत आमदार प्रसाद गावकर यांच्यासमवेत विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीकडे धाव घेतली. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी ढवळीकर यांना प्रतिसाद न देता विधानसभेचे कामकाज अडीच वाजेपर्यंत तहकूब केले.

विधानसभेत बोलू दिले जात नाही

आम्ही आमच्या मतदारसंघातील प्रश्न विधानसभेत मांडतो, त्यावर चर्चा होणे गरजेचे आहे. मात्र, सत्ताधारी भाजप चर्चा न करता कामकाज रेटून नेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विधानसभा सभागृहातूनच सुदिन ढवळीकर यांनी केला.

शेवटच्या दिवशी विरोधक आक्रमक

दोन दिवसीय विधानसभा अधिवेशनाची आज सांगता होत आहे. त्याबरोबरच सरकारच्या या टर्मचे शेवटचे अधिवेशन आहे. त्यामुळे, विरोधकांनी राज्यातील अपुरी रस्ते सुविधा, वीज सुविधा यावरून सरकारला धारेवर धरत विधानसभेत सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई, अपक्ष आमदार रोहन खवटे, मगो नेते सुदिन ढवळीकर यांनी सरकारला धारेवर धरले होते. मात्र, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देत आजच्या अर्ध्या सत्रातले कामकाज निभावून नेले.

हेही वाचा -Aryan drug case: एनसीबी मोतिहारी कारागृहात बंद असलेल्या मुंबईच्या 2 तस्करांची घेणार रिमांड

ABOUT THE AUTHOR

...view details