महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

झाडू मारणारी सफाई कर्मचारी झाली प्रशासकीय अधिकारी; ही जिद्द पहाच! - आरएएस 2018 निकाल

सफाई कर्मचारी ते प्रशासकीय अधिकारी असे उत्तुंग यश मिळविलेल्या आशा कंडारा यांचा प्रवास हा सिनेमाच्या कथानकासारखा आहे. तितकेच हा प्रवास आव्हानात्मक आणि संघर्षमयदेखील आहे.

आशा कंडारा
आशा कंडारा

By

Published : Jul 15, 2021, 4:20 PM IST

Updated : Jul 15, 2021, 5:22 PM IST

जयपूर - महापालिकेत सफाई कर्मचारी काम करणाऱ्या आशा कंडारा यांनी सैन्यदलात रुजू होण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र, हे स्वप्न पूर्ण होण्यापूर्वीच त्यांना विवाह आणि त्यानंतर घटस्फोटासारख्या चढ-उताराला सामोरे जावे लागले. अशा आव्हानात्मक परिस्थितीतही आशा यांनी हार मानली नाही. अखेर त्या राजस्थान प्रशासकीय सेवेच्या (आरएएस) परीक्षेत 2018 मध्ये पहिल्या प्रयत्नात यशस्वी झाल्या आहेत.

आशा यांनी 12 वी पास झाल्यानंतर 16 वर्षानंतर पदवी मिळविली आहे. त्यानंतर त्यांनी आरएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले आहे. आरएएस ही राजस्थानची सर्वात मोठी प्रशासकीय सेवा आहे. आशा यांनी स्वत:वर विश्वास ठेवत परीक्षेची तयारी सुरू केली. आरएएस परीक्षेकरिता 2018 मध्ये फॉर्म भरला. 2019 मध्ये पूर्व परीक्षा व त्यानंतर मुख्य परीक्षेतही यश मिळाले आहे. मात्र, हे यश मिळपर्यंत त्यांना आर्थिक आधारही हवा होता. त्यामुळे आशा यांनी महापालिकेत सफाई कर्मचारी पदासाठी अर्ज केला.

झाडू मारणारी सफाई कर्मचारी झाली प्रशासकीय अधिकारी

हेही वाचा-अहो, ऐकलं का? केवळ ५०० रुपयांत लग्न, SDO आणि लष्करातील मेजरचा समाजासमोर आदर्श

सलग 2 वर्षे जोधपूरमधील रस्त्यांची साफसफाई-

आरएएसची मुख्य परीक्षा दिल्यानंतर 10 दिवसांमध्ये त्यांची जोधपूर महापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून निवड झाली. त्यांनी उदरनिर्वाहासाठी सफाई कर्मचारी म्हणून काम केले. सलग 2 वर्षे जोधपूरमधील रस्त्यांवर त्यांनी सफाई कर्मचारी म्हणून काम केले आहे. दीर्घकाळ भरती प्रक्रिया सुरू राहिल्यानंतरही त्यांनी धीर सोडला नाही. मंगळवारी रात्री निकाल लागलेल्या आरएएस परीक्षेत त्यांच्या गुणवत्तेवर आणखी मोहोर उमटली आहे.

सलग 2 वर्षे जोधपूरमधील रस्त्यांची साफसफाई

हेही वाचा-केंद्र सरकारकडून इम्पेरिकल डेटा मिळावा.. छगन भुजबळांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

शिक्षणाशिवाय काहीही शक्य नाही!

आशा यांनी ईटीव्ही भारतला यश मिळविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. त्यांनी सांगितले, की या यशामागे आई-वडिलांकडून मिळालेले सहकार्य आहे. धैर्य हे सर्वात मोठे भांडवल आहे. ज्यांच्याकडे धैर्य हे भांडवल आहे, तो व्यक्ती काहीही मिळवू शकतो. शिक्षण घ्या. मुलांना शिकू द्या. शिक्षणाशिवाय काहीही शक्य नाही. महानगरपालिकेत सफाई कामगार म्हणून काम केले. कोणताही समाज अथवा काम लहान नसते. केवळ लोकांचे गैरसमज असतात. सर्वच कामे मोठी असतात. जेव्हा मला वेळ मिळत होता, तेव्हा मी अभ्यास करत होते. महिलांना शक्य नाही, असे कोणतेही काम नाही.

हेही वाचा-Video: अन् उद्दाम चालकानं पुराच्या पाण्यात घातली बस, पाहा पुढील थरार, पुढे काय झालं...

रोज 6 तास काम करून परीक्षेची तयारी-

आशा यांना दोन मुले आहेत. त्यांच्या शिक्षणाबाबतही आशा जागरूक आणि सक्रिय आहेत. त्यांच्या मुलाने पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. तर मुलगी आयआयटी जेईई परीक्षा उत्तीर्ण आहे. कोणतीही महिला घरात आणि कुटुंबासमवेत अभ्यास करू शकते. इच्छा असेल तर अभ्यासासाठी वेळ मिळू शकतो, असा त्यांनी सल्ला दिला. सफाई कामगारचे काम करताना 6 तास काम करावे लागत होते. तेव्हाही सोबत पुस्तके असायची. कोरोना महामारीत त्यांनी शहरातील मुख्य रस्त्यावर झाडूने साफसफाई केली. मात्र, आशा यांनी जिद्द आणि संघर्षाने सफाई कर्मचारी ते अधिकारी असा टप्पा गाठला आहे.

Last Updated : Jul 15, 2021, 5:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details