लखनऊ Subrata Roy Funeral :सहाराश्री सुब्रतो रॉय यांचं मुंबईतील कोकीलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात बुधवारी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर त्यांचं पार्थिव उत्तरप्रदेशातील त्यांच्या सहारा सिटी इथं नेण्यात आलं आहे. त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करत आहेत. आज सकाळी 10 वाजता सहारा सिटी इथून त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा निघणार असून भैंसकुंड इथं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी :सहारा समूहाचे अध्यक्ष सुब्रतो रॉय यांचं पार्थिव बुधवारी सायंकाळी सहारा सिटी इथं आणण्यात आलं. यावेळी त्यांचं अत्यदर्शन घेण्यासाठी उद्योपती, राजकीय नेते, आणि सहारा परिवारातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी मोठी गर्दी केली. अंत्यसंस्कारासाठी सहारा सिटीत येणाऱ्या नागरिकांची वाहने, चहापाणी आदींची व्यवस्था सहाराच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी केली होती. यावेळी अनेक नागरिकांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.
भैंसकुंड इथं होणार अंत्यसंस्कार :सहाराश्री सुब्रतो रॉय यांचं पार्थिव सहारा सिटी इथं अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. त्यांच्या अंत्ययात्रेला सकाळी 10 वाजता सुरुवात होणार असल्याची माहिती सहारा समूहानं दिली आहे.
सुब्रतो रॉय यांनी मुंबईत घेतला होता अखेरचा श्वास :सहारा समूहाचे अध्यक्ष सुब्रतो रॉय यांनी मुंबईतील कोकीलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात मंगळवारी रात्री अखेरचा श्वास घेतला. सुब्रतो रॉय हे गेल्या अनेक दिवसांपासून दीर्घ आजारासोबत लढत होते. मेटास्टॅटिक मॅलिग्नेंसी, हायपरटेन्शन आणि मधुमेहामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. मात्र उपचार सुरू असताना त्यांना मंगळवारी रात्री कार्डिओरेस्पीरेटरी अरेस्टमुळे त्यांचं निधन झाल्यानं मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा :
- Subrata Roy in Trouble : सहारा कंपनीचे सुब्रतो रॉय आणखीन अडचणीत; मध्य प्रदेश पोलिसांकडून अजामीनपात्र वॉरंट जारी
- Subrata Roy Passes Away : ‘सहाराश्री’ सुब्रतो रॉय यांचं निधन; चार्टर विमानानं लखनौला नेण्यात येणार पार्थिव