नवी दिल्ली -भाजप नेते सुब्रम्हण्यम स्वामी यांनी एअर इंडियाच्या निर्गुंतवणूक प्रक्रियेला (Air India disinvestment process) थांबवण्यात यावे, अशी मागणी केली आहे. यासाठी त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेत एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायाधीश डीएन पटेल यांच्या अध्यक्षतेखाली असलेले पीठ सुनावणी करणार आहे. ( Subramanian Swamy on Air India )
एअर इंडिया टाटाच्या ताब्यात -
सुब्रम्हण्यम स्वामी यांच्यावतीने अॅडव्होकेट सभरवाल यांनी याचिकेत म्हटले आहे की, एअर इंडियाच्या निर्गंतवणूक प्रक्रियेची चौकशी सीबीआय ने करावी. यासाठी न्यायालयाने निर्देश द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे. केंद्राने एअर इंडियाचा व्यवहार टाटासोबत केला. टाटा समूहाने एअर इंडियाला 18 हजार कोटी रुपयांमध्ये निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून ताबा मिळवला.
हेही वाचा -Samana Editorial On Galvan Valley : घरात बाता-सीमेवर लाथा!, 'सामना'तून मोदी सरकारवर प्रहार
एअर इंडिया आधी टाटाच्या ताब्यामध्येच होती. मात्र, केंद्राने तिच्यावर ताबा मिळवला होता. केंद्राने टाटाकडून एअर इंडियाची निविदा यशस्वीरित्या घेतल्यानंतर म्हटले होते की, कोणत्याही कर्मचाऱ्याला एका वर्षापर्यंत नोकरीवरुन काढले जाणार नाही. टाटा समुहाला कर्मचार्यांना कामावरून काढायचे असेल तर त्यांना VRS चा पर्याय द्यावा लागेल, असे म्हटले होते.