महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Female Constable Video Viral : महिला पोलिसाच्या व्हिडिओतून अनोख्या अदा, शेवटी बाबू म्हटल्याने होणार पोलीस तपास

कानपूरमध्ये विषारी द्रव्य प्राशन केल्याने एका हवालदाराचा मृत्यू झाला होता. ( Sub Inspector Death Case In kanpur ) त्याचे एका लेडी कॉन्स्टेबलसोबत संबंध असल्याचे तपासात उघड झाले. यामुळे त्याने विषारी द्रव्य प्राशन केले होते. त्याचवेळी एका महिला पोलिसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत ( Female Constable Video Viral In kanpur ) आहे. व्हिडिओच्या शेवटी 'बाबू' शब्दाचा उल्लेख आहे. मात्र तो कोण आहे, याचा तपास लागलेला नाही.

By

Published : Nov 17, 2022, 7:49 AM IST

Sub Inspector Death Case In kanpur
महिला पोलिसाचा मनमोहक व्हिडिओ

उत्तर प्रदेश :सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला पोलीस बॉलिवूड चित्रपटातील गाण्यावर व्हिडिओ बनवताना दिसत आहे.( Female Constable Video Viral In kanpur ) यामध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्याने व्हिडिओच्या शेवटी 'बाबू' शब्दाचा उल्लेख केला आहे. हा 'बाबू' कोण आहे, हे निश्चित होऊ शकले नाही. मात्र, ईटीव्ही भारत या व्हायरल व्हिडिओला दुजोरा देत नाही.

महिला पोलिसाच्या व्हिडिओतून अनोख्या अदा, शेवटी बाबू म्हटल्याने होणार पोलीस तपास

लेडी कॉन्स्टेबलसोबत संबंध :शहरातील बाह्य पोलिस स्टेशन बिधानू परिसरातून निलंबित असलेल्या उपनिरीक्षकाने 10 नोव्हेंबर रोजी विष पिले ( Sub Inspector Death Case In kanpur ) होते. त्यांची गंभीर प्रकृती पाहून त्यांना शहरातील रिजन्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान 14 नोव्हेंबर रोजी निरीक्षकाचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, निलंबनामुळे इन्स्पेक्टर बराच काळ डिप्रेशनमध्ये होते. यामुळे त्याने विष पिले. पण, तपासात त्याचे एका लेडी कॉन्स्टेबलसोबत संबंध असल्याचे समोर आले.

चौकशीचे आदेश दिले आहे : या संपूर्ण व्हायरल व्हिडीओबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी उत्तर देण्यास स्पष्ट नकार दिला. मात्र, या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश पोलीस आयुक्तालयाकडून देण्यात आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details