महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 17, 2022, 2:09 PM IST

ETV Bharat / bharat

Students Fell Ill In Tripura : त्रिपुरात माध्यान्ह भोजनाची बाधा, 35 मुले पडली आजारी

त्रिपुरामध्ये माध्यान्ह भोजन घेतल्यानंतर 35 मुले आजारी पडल्याची ( Students Fell Ill ) घटना घडली आहे. धलाई जिल्ह्यातील चावमनु येथील दयाराम कारबारी ज्युनियर बेसिक इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शनिवारी (१६ जुलै) मध्यान्ह भोजन घेतल्यानंतर 35 विद्यार्थी आजारी ( Students Fell Ill ) पडली. यातील सात विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले.

students fell ill
students fell ill

आगरतळा -शाळेमधील दुपारचे जेवण घेतल्यानंतर मुलांना अचानक पोटात दुखणे, अशक्तपणा, उलट्या ( Students Fell Ill ) होऊ लागल्या. महत्त्वाचे चौथी, पाचवीच्या मुलांना या भोजनानंतर त्रास झाला, परंतु पहिली ते तिसरीच्या मुलांनीही हेच अन्न खाल्ले होते. त्यांना कोणताही त्रास झालेला नाही. आजारी पडलेल्या मुलांमधील सात विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. शाळा प्रशासन ( School Administration ) सतर्क झाले असून जेवणाचे नमुने तपासले जाणार आहेत.

भाजप आमदारसंभू लाल चकमा यांनी सांगितले की, इयत्ता पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्याने प्रथम तेच अन्न खाल्ले होते, परंतु त्यांना कोणताही त्रास झाला नाही, परंतु इयत्ता चौथी आणि पाचवीचे विद्यार्थी हे अन्न खाल्ल्यानंतर त्यांना लगेचच त्रास जाणवू लागला. माध्यान्ह भोजनाचा सरकारी साठा शनिवारी संपल्यामुळे शिक्षकांनी स्थानिक बाजारातून मसूर आणले होते. हे या समस्येमागचे एक कारण असू शकते.” सात विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टर त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवून आहेत.

जेवणाचे नमुने पाठविण्याच्या सूचना - “शाळेत दिल्या जाणाऱ्या जेवणाचे नमुने गोळा करण्याच्या सूचना वरच्या स्तरावरून देण्यात आल्या आहेत. भाजीपाला, शिजवलेली खिचडी आणि इतर संबंधित गोष्टींचे नमुने गोळा करण्यात आले असून ते मुख्य वैद्यकीय अधिकारी कार्यालयात साठवले जातील. सोमवारी हे नमुने आगरतळा येथे तपासणीसाठी पाठवले जातील. चाचण्यांनंतरच या सामूहिक आजारामागील मुख्य कारण समजू शकेल.

ABOUT THE AUTHOR

...view details