महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Successful IPS Officer : पश्चिम बंगालमधील मराठमोळा अधिकारी; कॉलेजमध्ये इंग्रजीत नापास अन् आता थेट IPS

उच्च माध्यमिक परीक्षेत अनुत्तीर्ण उमेश गणपत खंडाबहल यांनी अभ्यास सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला होता. पण, नंतर वडिलांमुळे शाळा सोडलेल्या उमेश गणपत खंडाबहल यांनी पुन्हा अभ्यास सुरू केला. केवळ इंग्रजीमध्ये मास्टर्स केले नाही, तर UPSC उत्तीर्ण करून आयपीएस अधिकारी बनले. सध्या ते जलपाईगुडी येथे पोलीस अधीक्षक म्हणून तैनात आहेत. ई-टीव्ही भारतने त्यांच्यासोबत संवाद साधला असता, त्यांनी त्यांचा खडतर जीवनप्रवास उलगडला. F

Successful IPS Officer
काॅलेज जीवनात इंग्रजीत नापास झालेला विद्यार्थी

By

Published : Mar 31, 2023, 9:38 PM IST

Updated : Mar 31, 2023, 10:35 PM IST

पश्चिम बंगालमधील मराठमोळा अधिकारी

जलपाईगुडी/पश्चिम बंगाल : जिद्द आणि चिकाटी असेल तर जगात अशक्य असे काहीच नाही हे उदाहरण एका विद्यार्थ्याने खरे करून दाखवले आहे. कॉलेजला असताना तो विद्यार्थी इंग्रजीत नापास झाला होता. मात्र, नंतर अभ्यास आणि जिद्दीच्या जोरावर तो आता आयपीएस अधिकारी बनला आहे. उमेश गणपत खंडबाहले (IPS Umesh Khandbahal) यांची ही प्रेरणादायी कहाणी आहे. ईटीव्ही भारतने त्यांच्यासोबत संवाद साधून त्यांचा ख़डतर प्रवास जाणून घेतला आहे.

इंग्रजीत झाले होते नापास - नापास झाल्यानंतर उमेश गणपत खंडबाहले यांनी अभ्यास सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला होता. पण, नंतर वडिलांमुळे शाळा सोडलेल्या उमेश यांनी पुन्हा अभ्यास सुरू केला. केवळ इंग्रजीमध्ये मास्टर्स केले नाही, तर UPSC उत्तीर्ण करून आयपीएस अधिकारी बनले. सध्या ते जलपाईगुडी येथे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.

शाळा सोडून देण्याचा निर्णय -अपयशाने एखाद्याच्या यशाचा मार्ग मोकळा केला अशी उदाहरणे खूप कमी आहेत. इंग्रजीमध्ये 21 गुण मिळविलेल्या आणि वडिलांसोबत शेती करण्यासाठी अभ्यास सोडून आलेल्या उमेश यांनी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर इंग्रजीमध्ये मास्टर्स केले. त्यानंतर त्यांनी UPSC उत्तीर्ण करून आयपीएस अधिकारी देखील बनले आहेत. हा प्रवास खूप खडतर असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

यशस्वी आयपीएस अधिकारी :महाराष्ट्राचे रहिवासी असलेले उमेश हे यूपीएससी 2003 मध्ये उत्तीर्ण झाले आहेत. सुरुवातीला इंग्रजीत ते नापास झाले होते. पण, निराश होण्याऐवजी त्यांनी ब्रेक घेऊन आपल्या वडिलांसोबत शेतीवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. अपयश हे सर्व काही संपवत नाही आणि दृढ मन आणि निश्चित ध्येय सर्व काही बदलू शकते, असा विश्वास उमेश यांना आहे.

नापास झालेल्यांसाठी जग संपले नाही : उमेश म्हणाले, परीक्षेत नापास होणे म्हणजे विद्यार्थ्यांसाठी जगाचा अंत होणे असे नाही. यश मिळवण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती असली पाहिजे आणि ध्येय निश्चित ठेवले पाहिजे. एखाद्याने आशा सोडू नये कारण अपयश हा जीवनाचा भाग आहे आणि चिकाटीने त्यावर मात करता येते. त्यामुळे जिद्द, चिकाटी आणि मेहनत कराल तर यश नक्की तुमच्या पदरात आहे, असे उमेश म्हणाले.

दोन वर्षे अभ्यासातून ब्रेक :एसजी पब्लिक स्कूलमधून शालेय शिक्षण घेतलेल्या उमेश यांनी उच्च माध्यमिक परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यानंतर दोन वर्षे अभ्यासातून ब्रेक घेतला. माझे कुटुंब शेतीत होते म्हणून मी वडिलांसोबत शेतात काम करण्याचा निर्णय घेतला. नंतर त्यांच्या मित्रांच्या प्रोत्साहनाने मी महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात दूरस्थ शिक्षणाद्वारे पुन्हा अभ्यास सुरू केला.

यूपीएससी पासआऊट :आपल्या गावातील पहिला आयपीएस असलेला उमेश विज्ञान शाखेतून कला शाखेत गेला. घरी अभ्यास करून इंग्रजी साहित्यात पदवी संपादन केली. त्यांनी बी.एड. आणि हायस्कूलमध्ये विज्ञानाचा विद्यार्थी असल्याने फलोत्पादनात बीएससी त्यानंतर त्यांनी इंग्रजीमध्येही मास्टर्स केले. शिक्षण घेत असताना उमेश यांनी पोलिस पीएसआय परीक्षेलाही बसले, जी त्याने पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केली. यामुळे मला आयपीएस परीक्षेची तयारी करण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर मी प्रचंड अभ्यास करत UPSC उत्तीर्ण केली व त्यात मला 704 रँक मिळाली, असेही उमेश यांनी सांगितले.

उत्तर बंगालमधील विविध जिल्ह्यांमध्ये चांगले काम :उमेश यांनी उत्तर बंगालमधील विविध जिल्ह्यांमध्ये काम केले आहे. कोचबिहार जिल्ह्यातील दिनहाटा येथे SDPO आणि 2020 मध्ये अलीपुरद्वार जिल्ह्यात अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून काम केले आहे. या महिन्यात ते जलपाईगुडीचे पोलिस अधीक्षक म्हणून रुजू झाले आहेत. हे प्रेरणादायी प्रवास अनेक खचलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोलाचा ठरणारा आहे.

हेही वाचा :Expensive Apartment Sold Mumbai : अबब! मुंबईत खरेदी केले 369 कोटींचे घर; नेमकी कोण आहे 'ही' व्यक्ती

Last Updated : Mar 31, 2023, 10:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details