महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Student Molested In IIT : आयआयटीमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग, कॅम्पसमध्ये घोषणाबाजी

Student Molested In IIT : वाराणसीच्या आयआयटी बीएचयू कॅम्पसमध्ये बुधवारी मध्यरात्रीनंतर एका विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची घटना घडली होती. त्याविरोधात गुरुवारी शेकडो विद्यार्थ्यांनी राजपुताना वसतिगृह गाठून निदर्शने केली.

Student Molested In IIT
Student Molested In IIT

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 2, 2023, 6:36 PM IST

बीएचयू कॅम्पसमध्ये निषेध नोंदवताना निद्यार्थी

वाराणसी Student Molested In IIT : उत्तर प्रदेशात विनयभंगाच्या घटनात सातत्यानं वाढ होत आहे. बनारस हिंदू विद्यापीठाच्या आयआयटी कॅम्पसमध्ये बुधवारी एका विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची माहिती मिळाल्यानंतर हजारो विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये निषेध व्यक्त केलाय. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून विद्यार्थिनींची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, कठोर कारवाईच्या मागणीवर विद्यार्थी ठाम आहेत.

बीएचयूमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग :बनारस हिंदू विद्यापीठाच्या आयआयटी कॅम्पसमधील विद्यार्थ्यांनी बाहेरील विद्यार्थी विद्यापीठात विनयभंग करत असल्याचा आरोप केला आहे. कॅम्पसमध्ये मुलींच्या छेडछाडीच्या घटना सातत्यानं समोर येत आहेत. वसतिगृहांसमोर उभ्या असलेल्या मुंलीचींही छेडछाड केली जात आहे. त्याचवेळी बुधवारी आयआयटी-बीएचयूमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केलाय. गुरुवारी हजारो विद्यार्थांनी एकत्र येत कॅम्पसमध्ये निदर्शने सुरू केली. यावेळी विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत कारवाईची मागणी केली. यासोबतच विद्यापीठ परिसरात बाहेरील घटकांच्या प्रवेशावर बंदी घालण्याची मागणीही करण्यात आली.

कॅम्पसमध्ये संचालकांना रोखून घोषणाबाजी : आयआयटी-बीएचयूच्या विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये संचालकांना रोखून घोषणाबाजी केलीय. तसंच विद्यार्थ्यांनी राजपुताना वसतिगृहाबाहेर पोहोचून विद्यापीठ कॅम्पसमधील सुरक्षेबाबत संताप व्यक्त केला. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांच्या हातात पोस्टर्स, बॅनरही होते. आतापर्यंतचा सर्वात मोठा गुन्हा 1 नोव्हेंबर रोजी घडल्याचं विद्यार्थिनींचं म्हणणं आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाकडं कॅम्पस बंद करण्याची मागणी केली.

कायदेशीर कारवाई करणार : आंदोलक विद्यार्थिनींचं म्हणणं आहे की, बुधवारी रात्री 2 वाजता आयआयटीची एक विद्यार्थिनी एका विद्यार्थासोबत बाहेर जात होती. यावेळी बाहेरून आलेल्या काही इसमांनी आधी दोघांना वेगळं केलं. यानंतर मुलीला बाजूला घेऊन तिच्यासोबत अश्लील कृत्य केलं. या संपूर्ण प्रकरणी पोलीस अधीक्षक प्रवीण सिंह यांनी सांगितलं की, विद्यार्थ्यांना समजवण्याचा प्रयत्न सुरू आहे. सीसीटीव्हीच्या मदतीनं आरोपींची ओळख पटवली जात आहे. लवकरच सर्व आरोपींना अटक करून कायदेशीर कारवाई केली जाईल.

हेही वाचा -

  1. Amravati Crime: विद्यार्थिनीचा विनयभंग केल्यानं पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल, आरोपी क्रीडा शिक्षकाच्या तक्रारीनंतर कथित पत्रकाराविरोधात गुन्हा
  2. Doctor Accused : विद्यापीठात विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या डॉक्टरला अटक
  3. Riaz Ahmed: उपविभागीय अधिकाऱ्यावर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल; झारखंडमधील घटना

ABOUT THE AUTHOR

...view details