काल हिंडन हवाई तळावरून उड्डाण घेतलेल्या IAF ची तीन C-17 हेवी लिफ्ट वाहतूक विमाने आज सकाळी हिंडन येथे परत आली. या विमानांनी रोमानिया, स्लोव्हाकिया आणि पोलंडमधून 629 भारतीय नागरिकांना बाहेर काढले. या उड्डाणांनी भारतातून या देशांमध्ये 16.5 टन रिलीफ लोड देखील वाहून नेला.
Operation Ganga : रोमानिया, स्लोव्हाकिया आणि पोलंडमधून 629 भारतीय नागरिकांना बाहेर काढले - ऑपरेशन गंगा
11:54 March 05
11:49 March 05
11:35 March 05
629 भारतीय परतले
08:28 March 05
वैद्यकिय विद्यार्थ्यांना दिलासा
युक्रेनमधून भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्याी मायदेशात येत आहे. नॅशनल मेडिकल कमिशन (NMC) परदेशी वैद्यकीय पदवीधरांना कोरोना तसेच युद्धासारख्या परिस्थितीमुळे अपूर्ण इंटर्नशिपसह त्यांनी FMGE पास केल्यास भारतात पूर्ण इंटर्नशिपसाठी अर्ज करण्याची परवानगी दिली आहे.
08:27 March 05
विशेष इंडिगो विमान रोमानियातील सुसेवा येथून दिल्लीत पोहोचले
युक्रेनमधील 229 भारतीय नागरिकांना घेऊन एक विशेष इंडिगो विमान रोमानियातील सुसेवा येथून दिल्लीत पोहोचले.
07:14 March 05
विद्यार्थ्यांचे हाल
कीव - रशियाने युक्रेन विरोधात पुकारलेल्या युद्धाचे ( Ukraine Russia Conflict ) जगभरात पडसाद उमटले आहेत. संपूर्ण जगात भीतीचे वातावरण आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे परिस्थिती फार बिकट झाली आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या या हल्ल्याचा आता जगभरातून निषेध करण्यात येत असून, युद्ध थांबावावे अशी मागणी होत आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर युरोपीयन संघातील देशांनी एकत्र येत रशियावर कडक आर्थिक निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धात एका भारतीय विद्यार्थ्याला जीव गमवावा लागला. आणखी एक विद्यार्थी कीवमध्ये गोळीबारात जखमी झाला, अशी माहिती केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंग यांनी दिली. हा विद्यार्थी कीवमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत असताना त्याला गोळी लागली. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे ते म्हणाले. या विद्यार्थ्याचे नाव हरज्योतसिंग असे असून, तो मूळचा छत्तरपूरचा आहे.