कुल्लू (हिमाचल प्रदेश) : जिल्ह्यातील बंजार भागात एका अकरावीच्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येची घटना समोर आली आहे. (student commits suicide in kullu). या विद्यार्थ्याने झोप न येत असल्यामुळे आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. (Student commits suicide due to lack of sleep in kullu). मंगळवारी विद्यार्थ्याचा मृतदेह त्याच्या घरी आढळून आला. मृतदेहाजवळ एक सुसाईड नोटही सापडली आहे.
Student Suicide In Kullu : धक्कादायक! झोप न लागल्यामुळे 11वीच्या विद्यार्थ्याने केली आत्महत्या - विद्यार्थ्याने झोप न येत असल्यामुळे आत्महत्या
हिमाचलच्या कुल्लू जिल्ह्यातील बंजारमध्ये एका विद्यार्थ्याने वाईट स्वप्नांमुळे झोप न आल्याने आत्महत्या केली. (Student commits suicide due to lack of sleep in kullu). पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे. (Student commits suicide in Kullu) (student commits suicide due to sleep deprivation)
![Student Suicide In Kullu : धक्कादायक! झोप न लागल्यामुळे 11वीच्या विद्यार्थ्याने केली आत्महत्या Etv Bharat](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-17269788-thumbnail-3x2-kullusuicide.jpg)
सुसाईड नोटमध्ये लिहिले आत्महत्येचे कारण :हाविद्यार्थी आपल्या कुटुंबासह कुल्लू जिल्ह्यातील बंजार येथे भाड्याच्या घरात राहत होता. मृताच्या बहिणीने सांगितले की, ती काल संध्याकाळी घरी आली तेव्हा खोलीत तिच्या भावाचा मृतदेह पडलेला होता. ज्याची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली आणि त्यानंतर पोलीसही घटनास्थळी पोहोचले. 17 वर्षीय विद्यार्थ्याच्या मृतदेहाजवळ एक सुसाईड नोटही सापडली आहे. बहिणीच्या म्हणण्यानुसार, मृताने सुसाईड नोटमध्ये लिहिले होते की, रात्री झोपताना मला भयानक स्वप्न पडत आहेत, त्यामुळे मी काळजीत आहे. गेल्या 6-7 दिवसांपासून मला झोप लागलेली नाही. झोप न येत असल्यामुळे तो खूप अस्वस्थ होता.
कुटुंबीयांना कोणावरही संशय नाही :पोलिसांनी शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला आहे. विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधीक्षक गुरदेव शर्मा यांनी सांगितले की, कुटुंबीयांचे जबाब नोंदवण्यात आले असून विद्यार्थ्याच्या मृत्यूबाबत कुटुंबीयांनी कोणतीही शंका उपस्थित केलेली नाही. याप्रकरणी पोलिसांनी सीआरपीसी कलम १७४ अन्वये कारवाई केली आहे.